एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जळगावात भाजपने उमेदवार बदलला, स्मिता वाघ यांचा पत्ता कट, उन्मेष पाटलांचा उमेदवारी अर्ज
स्मिता पाटील यांचा पत्ता कट करत भाजपने चाळीसगावचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आज एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला.
जळगाव : जळगावात भाजपनं आपला उमेदवार बदलला आहे. स्मिता वाघ यांचा पत्ता कट करत भाजपनं चाळीसगावचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आज एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे पाटील अर्ज भरताना स्मिता वाघही उपस्थित होत्या.
भाजपमधील गटबाजी आणि पराभवाच्या भीतीने भाजपनं स्मिता वाघ यांच्यायऐवजी उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातं आहे. जळगावातील विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत. दुसरीकडे आघाडीने गुलाबराव पाटलांना उमेदवारी दिल्याने त्यांचं पारड जड झाल्याची चर्चा मतदारसंघात होती. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.
उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चाळीसगाव मतदार संघातील त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या घरी गर्दी केली होती. यावेळी उन्मेष पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली.
पक्षाने आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानंतर आपण अर्ज भरला आहे. पक्ष आणि पक्षाचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं सांगत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी राहावं असं आवाहन उन्मेष पाटील यांनी केलं आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
Advertisement