एक्स्प्लोर

Bihar Election Result 2025 Ambadas Danve: काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते, पण पराभव होतो; बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच अंबादास दानवेंचं टीकास्त्र

Bihar Election Result 2025 Ambadas Danve: बिहारच्या निवडणुकीत मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भाजप आणि जदयूच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

Bihar Election Result 2025 Ambadas Danve: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे लक्ष वेधून ठेवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025 ) अखेर शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भाजप (BJP) आणि जदयूच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 243 पैकी 101 जागांवर उमेदवार उभे केले असून, विशेष म्हणजे भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी प्रथमच समान संख्येने जागांवर निवडणूक लढवली आहे. 2020 च्या निवडणुकीत भाजप 74 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा तर जेडीयू 43 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. दोन्ही पक्षांनी मिळून एनडीए सरकारची स्थापना केली होती. तसेच राष्ट्रीय जनता दलने 143 जागा, काँग्रेसने 61 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 जागा आणि विकसनशील इंसान पार्टीने 12 जागा लढवल्या.  सध्याच्या कलांवर नजर टाकल्यास, एनडीए आघाडी 193 जागांवर आघाडीवर असून महागठबंधन 45 जागांवर पुढे आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केलाय.  

अंबादास दानवे म्हणाले की, पराभव झालेला मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Ambadas Danve on Congress:  काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, जागावाटप अखेरच्या दिवशीपर्यंत होत असेल तर गंभीर आहे. याचे परिणाम निकालावर होतात. महाराष्ट्रात निवडणुकीवेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले असते, जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते. जी चूक महाराष्ट्रामध्ये झाली तीच बिहारमध्ये झाली. काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

Chandrashekar Bawankule: काँग्रेसला जनतेने नाकारले : चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काँग्रेसवर टीका केलीय. काँग्रेस रोजच संपत आहे, राहुल गांधी हतबल झाले आहेत. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करत आहे. विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. काँग्रेसला बिहारमधून बाहेर काढले आहे. आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.  

आणखी वाचा

Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget