एक्स्प्लोर

Nagpur News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठी फूट; नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

Maharashtra Politics : नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या सहा प्रमुख पदाधिकार्‍यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Nagpur News : राज्यात पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. अशातच काँग्रेसच्या गोटातून एक महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या सहा प्रमुख पदाधिकार्‍यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडल्याचे चित्र आहे.  

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश 

उमरेड पंचायत समितीतील सभापती गीतांजली नागभीडकर आणि उपसभापति सुरेश लेंडे, पंचायत समिती सदस्य दादाराव मांडसकर, पंचायत समिती सदस्य प्रियंका लोखंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर भिवापूर पंचायत समितीचे उपसभापती राहूल मसराम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच उमरेड बाजार समितीचे संचालक भिकाजी भोयर यांनी ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. 

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसमध्ये मोठं भगदाड

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात महायुतीचा (Mahayuti) दारूण पराभव झाला. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) भरघोस मतदान मिळत दणदणीत विजय मिळाला होता. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. यानंतर महाविकास आघाडातील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मविआला टोला लगावला. लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, असे म्हणत त्यांनी मविआला घरचा आहेर दिला. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना स्वबळाचा नारा दिला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडल्याचे चित्र आहे. 

कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो

नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Shivsena UBT : स्वबळावर लढावंच लागेल, संजय राऊतांच्या भूमिकेला अरविंद सावंतांचा पाठिंबा; ठाकरेंच्या सेनेचं एकला चलो धोरण

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
Latur News : मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
Kalyan Police : कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
Manoj Jarange : जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
Latur News : मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
Kalyan Police : कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
Manoj Jarange : जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?  
Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?  
गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट
गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट
जयस्वाल, अय्यरला भारताच्या टीममध्ये संधी न मिळाल्यानं चर्चा, टीममध्ये बदल करण्याची अजून एक संधी, आशिया कपचा नियम काय?
आशिया कपसाठी टीममध्ये 'या' तारखेपर्यंत बदल करता येणार, जाणून घ्या महत्त्वाचा नियम 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2025 | मंगळवार
Embed widget