एक्स्प्लोर

Shivsena UBT : स्वबळावर लढावंच लागेल, संजय राऊतांच्या भूमिकेला अरविंद सावंतांचा पाठिंबा; ठाकरेंच्या सेनेचं एकला चलो धोरण

Arvind Sawant : खासदार अरविंद सावंत यांनी देखील संजय राऊत यांच्यापाठोपाठ स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं ते म्हणाले.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना स्वबळाचा नारा दिला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.  ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते. कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि त्रांगड होत असेल तर अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावं. स्वबळावर लढावं, संजय राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, असं अरविंद सावंत म्हणाले. 

आमच्याकडे काही शिवसैनिक म्हणतात एकटे लढलो असतो तर 20 पेक्षा अधिक आलो असतो असं म्हणतात. उद्धव ठाकरे एकटे होते, युती तुटली होती, कोणी बरोबर नव्हते. आठवले, जानकर सोडून गेले होते, विधानसभा निवडणुकीत एकटं लढल्यानंतर 63 आमदार निवडून आले होते. तो अनुभव गाठिशी आहे. निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे. एकटं लढलं की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, असं अरविंद सावंत म्हणाले.    

शिवसेनेची ताकद अगोदरपासून होती.शिवसेना महापालिकेवर 1985 पासून राज्य करतेय. भाजपसोबत देखील अनेकदा युती झाली नव्हती. मराठी माणसाचं अस्तित्व,अस्मिता, महाराष्ट्राचा धर्म आज बुडित आहे. सारंच विकलं गेलं आहे. सारंच विकलं गेलं आहे. भ्रष्टाचार टोकाचा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाला, अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असतो त्याला आव्हान देण्याची गरज आहे. ती महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांचा धर्म दाखवणं आवश्यक आहे, असं अरविंद सावंत म्हणाले. 

संजय राऊतांचा स्वबळाचा नारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे जाहीर केले. इतर पक्षांनी पण कार्यकर्त्यांसाठी स्वबळावर निवडणूक लढवावी असा सल्लाही त्यांनी दिला. 

नागपूर पासून मुंबई पर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत.एकदा आम्हाला पाहायचं आहेच, जे काही होईल ते होईल. आमचं असं ठरतंय की मुंबई,ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार याचा विचार करावा लागेल. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं संजय राऊत म्हणाले.  राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू मित्र नसतो. राजकारणात काही असंभव नसतं, असं संजय राऊत म्हणाले. 

इतर बातम्या :

'स्वबळाची इच्छा असल्यास आम्ही थांबवणारे कोण...', राऊतांच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हांडांची मांडली स्पष्ट भूमिका, तिन्ही नेत्यांच्या चर्चेबाबत केला खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
Embed widget