एक्स्प्लोर
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा लढविणार, लोकसभा पोटनिवडणुकही लढणार : अभिजीत बिचुकले
दरम्यान शरद पवार उभे राहिले तर त्यांच्या विरोधात 100 टक्के लढणार असल्याचेही त्याने सांगितलं. उदयनराजे शिवरायांच्या घराण्यात जन्माला आलेत तरी त्यांच्यासमोर लोकशाही पद्धतीने लढलो तर मग शरद पवारांना का सोडू?, असे तो म्हणाला.
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा लढविणार असून सातारा लोकसभा पोटनिवडणुकही लढणार असल्याचे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेने सांगितलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्याने ही माहिती दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा लढविणार असून अखिल बहुजन समाज सेना पक्षातर्फे ही निवडणूक लढवणार असल्याचे बिचुकलने सांगितलं. निवडणूक लढण्यास इच्छुक कार्यकर्त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्याने केले आहे.
भ्रष्ट प्रशासनास धडा शिकवण्यास चांगला मुख्यमंत्री हवा. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर शर्ट बदलून जॅकेट वापरायला लागले. हा बदल आहे का, हा विकास झाला का? मला लोकांनी मोठं केलं आहे. लोकांनी मला डोक्यावर घेतले आहे, असेही बिचुकले म्हणाला.
मला बिग बॉसचं नाही, समाजातल्या प्रश्नाचं कौतुक आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याआधी इतके दिवस हे झोपले होते का? आताच का गुन्हा दाखल करत आहात ? दहा वर्षे काय केलं?महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यात पवारांचे प्रयत्न आहेत, असेही तो म्हणाला.
दरम्यान शरद पवार उभे राहिले तर त्यांच्या विरोधात 100 टक्के लढणार असल्याचेही त्याने सांगितलं. उदयनराजे शिवरायांच्या घराण्यात जन्माला आलेत तरी त्यांच्यासमोर लोकशाही पद्धतीने लढलो तर मग शरद पवारांना का सोडू?, असे तो म्हणाला.
लोकसभा लढणे अधिक योग्य वाटतं. माझं हिंदी आणि इंग्रजी अधिक चांगलं आहे, असेही त्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement