एक्स्प्लोर

बजरंग सोनवणेंचा मोठा विजय, बीडच्या हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव

Lok Sabha Election Result 2024 : बीडची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली? इथे कुठले फॅक्टर निकाल ठरवणार याची सगळ्यांना कल्पनाही आली. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार, हे प्रामुख्याने जातीय समीकरण ठरवणार आहेत. 

Beed North Lok Sabha Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे.. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला. आता केवळ सहा मतदान यंत्र मतदान यंत्र मोजणे बाकी होती. त्यामध्येही बजरंग सोनवणेंनी बाजी मारली आहे. 

मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार,याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेय. भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील फरक खूपच कमी आहे. अखेरच्या फेरीनंतर बीडचा खासदार कोण? हे स्पष्ट होणार आहे. 

फेरमतदानाची मागणी -

पंकजा मुंडे यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.  पंकजा मुंडे यांचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी फेरमतमोजणी मागणी करण्यात आली.

पाटोदा तालुक्यातील 20 गाव ठरवणार बीडचा खासदार - 

पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली. कधी पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली, तर कधी बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनंतर चित्र बदलत गेले. उमेदरांसोबत कार्यकर्त्यांमध्येही धाकधूक वाढली होती. 32 व्या फेरीनंतर बीडमधील चित्र स्पष्ट होईल. अखेरच्या फेरीमध्ये पाटोदा ताल्यातील 20 गावांनी बीडचा खासदार ठरवला. बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असताना या मतमोजणीने नाट्यमय वळण घेतले आहे. केवळ दोन फेरी मतमोजणीच्या बाकी असताना बजरंग सोनवणे हे दोन हजार मतांनी आघाडीवर गेले.

पंकजा मुंडेंची 38 हजारांची आघाडी बजरंग सोनवणेंनी मोडून काढली -  

22 व्या फेरीअखेर पंकजा मुंडे यांच्याकडे 38 हजार मतांची आघाडी होती. पण त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मुसंडी मारत ही आघाडी मोडून काढली. कधी पंकजा मुंडे आघाडीवर तर कधी बजरंग सोनणे आघाडीवर राहिले. अखेरच्या 15 फेऱ्यामध्ये बीडमधील लढत अतिशय रंजक झाली.

बीड लोकसभा मतदार संघात कोण कोणत्या फेरीत आघाडीवर ?

पहिली फेरी - बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर

दुसरी फेरी - बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर  

सहावी फेरी - बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर 

सातवी फेरी - बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर 

दहावी फेरी - पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर

11 वी फेरी - पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर

12 वी फेरी - बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर 

13 वी फेरी - बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर

15 वी फेरी - पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर 

18 वी फेरी - पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर 

19 वी फेरी - पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर 

20 वी फेरी - पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर 

21 वी फेरी - पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर

22 वी फेरी - पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर 

23 वी फेरी - पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर 

24 वी फेरी - पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर 

25 वी फेरी - पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर 

26 वी फेरी - पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर

27 वी फेरी - पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर 

28 वी फेरी - बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर 

29 वी फेरी - बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर

30 वी फेरी - बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर

31 वी फेरी - बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर 

 

32 व्या फेरीनंतर

बीड लोकसभा निकाल 2024 (Beed Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते निकाल
पंकजा मुंडे     
बजरंग सोनवणे    

बीड लोकसभा मतदारसंघात दोन वेळ खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत भाजपने पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले. चेहरा बदलल्यामुळे या मतदारसंघातील समीकरणं अनुकूल होतील, असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर बीडच्या निकालाने सगळ्यांचीच धडधड वाढवली.  नरेंद्र मोदींचा चेहरा आणि राष्ट्रीय मुद्द्यांना पुढे करत ही निवडणूक भाजपने लढवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक मतदारसंघात स्थानिक मुद्दे जास्त वरचढ ठरले. त्यात बीड लोकसभा मतदारसंघात आधीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनाची धग जाणवत होती. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या जमेच्या बाजू बघत उमेदवार निवडले, पण जातीय संघर्षानेच इथला प्रचार संपला.  पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत आहे. बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा... अशीच ही निवडणूक झाली. उमेदवार आणि प्रचार... अशी चौफेर ही निवडणूक जातीय समीकरणांभोवतीच फिरली. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल उत्कंठावर्धक असणार आहे.

2019 मध्ये काय निकाल लागला -

प्रीतम मुंडे यांना 6 लाख 78 हजार 175 मते तर बजरंग सोनवणे यांना 5 लाख 9 हजार 108 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे 91  हजार 972 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात 36 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. 

राज्यात सर्वाधिक मतदान बीड जिल्ह्यात झाले -

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झालं. यात बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सुमारे 70.92  टक्के मतदान  झाले. बीडमध्ये राज्यात सर्वाधिक 70.92 एवढ्या  मतदान झालं असल्याची नोंद समोर येते आहे. तिसऱ्या टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात उन्हामुळे राज्यात ठिकठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला असताना चवथ्या टप्यात मतदान करणाऱ्या बीडकरांनी मात्र उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानाला न जुमानता रेकॉर्ड ब्रेक 70.91टक्के  मतदान करून  आपलं वेगळेपण जपले आहे . सर्वाधिक बीडमध्ये 70.91टक्के तर नंदुरबार मधे 70.68टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत 4% पेक्षा मतदान वाढ झाल्यानंतर हे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडतं, त्यावर बीडचा खासदार कोण हे ठरणार आहे. बजरंग सोनवणे यांची तुतारी वाजणार की भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बीड  लोकसभेत पंकजा मुंडेचे कमळ पुन्हा फुलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

बीड लोकसभेत कोण कोणते आमदार ?

गेवराई - भाजप - लक्ष्मण पवार

माजलगाव - राष्ट्रवादी (अजित पवार)- प्रकाशदादा सोळुंके 

बीड - राष्ट्रवादी (शरद पवार) - संदीप क्षीरसागर

आष्टी - राष्ट्रवादी (अजित पवार)- बाळासाहेब अजबे 

केज - भाजप - नमिता मुंदडा

परळी - राष्ट्रवादी (अजित पवार)- धनंजय मुंडे 

मनोज जरांगे फॅक्टर निर्णायक - 

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन काही काळ स्थगित झालेल असलं तरी त्याचा प्रभाव आणि धग बीड  जिल्ह्यात सुरुवातीपासून होती. तो प्रभाव लोकसभा निवडणुकीवर जाणवत असल्याचे चित्र होते . एकीकडे मराठा समाज या आंदोलनामुळे एकवटला असल्याचं चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांचा ताफा गावात आल्यानंतर मराठा आरक्षण समर्थकांनी घोषणा दिल्याचं व ताफा अडवल्याचे  चित्र काही गावात  पाहायला मिळाले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीदरम्यान केलेली वक्तव्ये मराठा समाज एकत्र करण्यास कारणीभूत ठरल्याचे ही चित्र होते. त्याचा फायदा बजरंग सोनवणे यांना झाला.

तर बीड जिल्ह्यात असणारा वंजारा आणि इतर ओबीसी समाजही मराठा  एकवटण्या च्या क्रियेला प्रतीक्रिया या न्यायाने एकवटल्याचे पहायला मिळाले. वंजारा, माळी,धनगर, बंजारा जाती समूह एकत्रित गुंफल्याचे व तो पंकजा मुंडेंच्या पाठीशी राहिल्याचे या निवडणुकीत दिसले. त्यामुळे जातीच ध्रुवीकरण हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत प्रकर्षाने यंदा जाणवलेला आहे .या जातीपातीच्या राजकारणात कोण मुसंडी मारतो हे येत्या काळात समोर येणार आहे.

टीका, आरोप-प्रत्यारोप

बीडमध्ये 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान  झाले. यंदा  लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलेच तापले  .आरोप प्रत्यारोप  झाले. मंत्री धनंजय मुंडे यांनी तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर सभेतून टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि भाजपासाठी ही सभा अनुकूल ठरली. नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख असल्याने जिल्ह्याला भरभरून निधी त्या खासदार झाल्या तर आणू शकतील. त्यामुळे त्यांना निवडून देण्याचा आवाहन ते करत आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनीही, पंकजाला निवडून द्या, पंतप्रधान मोदींसोबत मी जिल्ह्याच्या विकासाची गॅरंटी देतो, असे आवाहन बीडच्या जनतेला केले.

पंतप्रधान मोदी यांनी अंबाजोगाईत सभा घेऊन गोपीनाथ मुंडे यांची स्वप्नपूर्ती पंकजाला करायची आहे. त्यामुळे निवडून देण्याचे आवाहन केले. तर त्यांच्याविरोधात बजरंग सोनवणे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावलौकिकास पात्र ठरलेला वैद्यनाथ साखर कारखाना हे बहीण-भाऊ चालू शकले नाहीत. आश्वासन देऊन अजून रेल्वे बीडपर्यंत आली नाही . ऊसतोडणी कामगाराचे प्रश्न तसेच आहेत. विकास बीडपासून दूर आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे  अध्यक्ष  शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बजरंग सोनवणे व अन्य महाविकास आघाडी नेत्यांनी करत सर्व सामान्य घरातील उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यावेळी निवडून देण्याचे आवाहन केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget