एक्स्प्लोर

वसमत विधानसभा मतदारसंघ | निवडणुकीची चाहूल लागताच सर्वच इच्छुक सक्रिय

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिकवेळा दोन जयप्रकाश सत्तेत राहिलेत. कधी ते राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेकर असतात तर कधी काँग्रेसचे जयप्रकाश मुंदडा. या दोघांनी कधी नवं नेतृत्व तयारच होऊ दिलं नाही असं म्हणतात. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मात्र चित्र किंचित बदललंय.

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच वसमत विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटण्यासाठी कंबर कसली आहे. युती होईल अथवा नाही मैदानात उतरायचेच असा चंग भाजपचे इच्छुक उमेदवार अॅड. शिवाजीराव जाधव यांनी बांधला आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे जोरदार तयारीला लागले असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या गळतीमुळे शांतता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीमध्ये ही या मतदारसंघात सामसूम दिसत आहे. कोणताच इच्छुक उमेदवार सध्या डोकं वर काढताना दिसत नाही.
राज्यपातळीवर भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेना इच्छुक आणि उत्सुक दिसत असली तरी भाजपमध्ये होत असलेली मोठ्या नेत्यांची मेगाभरती पाहता शिवसेनेसोबत युती करणार नाही, स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाणार असा वसमतमधील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांचा समज आहे.
शिवसेना-भाजपची युती झाल्यास वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये वसमतची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. इथून शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनाच उमेदवारी मिळू शकते हे सर्व माहीत असतानाही भाजपच्या इच्छुकांनी स्वबळाची तयारी सुरु केलीय.
भाजपचे अॅड. शिवाजीराव जाधव यांनी अनेक दिवसापासून गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी जमवून अॅड. शिवाजीराव जाधव यांनी शक्तीप्रदर्शनही  केलं. शिवाजी जाधव यांचे झंझावती प्रचार दोरे, मुख्यमंत्र्याची सभा हे पाहता शिवसेना-भाजप युती विषयी संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. भाजपने प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केल्याने, स्वबळाच्या चर्चेला चांगलंच बळ मिळालं आहे.
तर शिवसेना देखील या मतदारसंघात कुठेच कमी नाही. वसमत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. राज्याचे माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे मतदारसंघाचे शिवसेनेकडून विद्यमान आमदार आहेत.  2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत झाली होती. यात शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांचा विजय झाला होता.
2014 विधानसभा वसमत निवडणूक निकाल
विजयी उमेदवार जयप्रकाश मुंदडा मिळालेली मते- 63851
राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर - 58295
भाजपचे शिवाजीराव जाधव - 51197
काँग्रेसचे अब्दुल हाफिज अब्दुल रहमान - 13996
2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी वसमत मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यास राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकर इच्छुक आहेत. भाजपकडून शिवाजीराव जाधव, शिवसेनेकडून जयप्रकाश मुंदडा उत्सुक आहेत.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव इच्छुकांच्या चर्चेत सध्यातरी दिसत नाही.
या मतदारसंघात मतदान हे जातीच्या आधारावर होत नसून विकास कामाच्या आधारावर होत असते. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर आणि काँग्रेसचे जयप्रकाश मुंदडा या दोघांनीच सत्ता भोगली आहे. तर या वेळेस नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का, हा वसमतकरांसाठी उत्सुकतेचा विषय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget