एक्स्प्लोर

बदनापूर विधानसभा मतदारसंघ : युतीतली धुसफूस आघाडी आणि वंचीतसाठी फायद्याची ठरणार का?

जालना जिल्ह्यातील बदनापूर हा एक राखीव मतदारसंघ, सध्या भाजपचे नारायण कुचे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. तसा शिवसेनेचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी प्रस्थापितांच्या विरोधात कौल देणं हा या मतदारसंघाचा स्वभाव आहे. अपवाद फक्त शिवसेनेचा, शिवसेना आमदार नारायण चव्हाण सलग तीनवेळा इथून निवडून गेले आहेत.

बदनापूर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर, म्हणजेच 2009 साली मतदारसंघाच्या भौगोलीक क्षेत्रात बदल होऊन, त्यामध्ये अंबड शहर आणि तालुक्यातील मोठा भाग समाविष्ट झाला. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड या चार तालुक्यातील गावांचा समावेश असेलला हा मतदारसंघ आहे.  मतदारसंघात शेती व्यवसायाशीच निगडित असलेला मोठा मतदार आहे. 2009 साली झालेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला.
या मतदारसंघाच्या इतिहासात अनेकदा प्रस्थापितांच्या विरोधात मतदान झाल्याचा इतिहास आहे. 1972 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे वजनदार नेते भगवंतराव गाढे यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार बाजीराव चव्हाण पाटील निवडून आले होते. 1978 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उभे राहिलेले तत्कालीन आमदार बाजीराव चव्हाण यांचा इंदिरा काँग्रेसचे शंकरराव वाकुळणीकर यांनी पराभव केला. तर 1980 मध्ये या मतदारसंघातून इंदिरा काँग्रेसच्या शकुंतला शर्मा निवडून आल्या. त्यानंतर 1985 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून समाजवादी काँग्रेसकडून आप्पासाहेब चव्हाण निवडून आले. त्यानंतर 1990,1995 आणि 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नारायण चव्हाण सलग निवडून आले.  2004 मध्ये शिवसेनेने नारायण चव्हाण यांना डावलून भानुदास घुगे यांना उमेदवारी दिली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद चव्हाण यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2009 साली हा मतदार संघ आरक्षित झाला आणि शिवसेनेचे उमेदवार संतोष सांबरे हे निवडून आले. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामध्ये शिवसेनेचे संतोष सांबरे यांचा पराभव करून निवडणुकीच्या केवळ महिनाभर अगोदर प्रचाराला लागलेले भाजपचे नारायण कुचे निवडून आले.
2014 च्या विधासभा निवडणूक उमेदवारांना मिळालेली मते नारायण कुचे (भाजप) - 73,560 बबलू चौधरी (राष्ट्रवादी) - 50,065 संतोष सांबरे (शिवसेना) - 30,945
2019 लोकसभा बदनापूर मतदारसंघातील मताधिक्य
रावसाहेब दानवे - (भाजप) -1,22818 विलास औताडे - (काँग्रेस) - 60,027
जिल्ह्यात भाजपकडे एक केंद्रीय राज्यमंत्रीपद आणि एक राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद आहे तर शिवसेनेकडेही एक राज्यमंत्रीपद आहे. बदनापूर पंचायत समिती आणि बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. त्याशिवाय या मतदारसंघात येणारी अंबड नगरपरिषद ही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सध्या भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे.
त्यातुलनेत या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला जेमतेम 7 टक्के मते पडली होती आणि काँग्रेस उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता.
या मतदारसंघावर, शिवसेना दावा सांगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून सध्या बबलू चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत 50 हजार मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तर शिवसेनेचे संतोष सांबरे यांची अनामत रक्कम जप्त होऊन ते या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर ढकलले गेले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची भूमिका या मतदारसंघात महत्वाची ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षे काम केलेले सुदाम सदाशिवे यांनी अलीकडे वंचित बहुजनमध्ये प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघातील उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत. या बरोबरच या मतदारसंघातून सुधाकर निकाळजे देखील वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत.
शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून राज्यात एकत्रित निवडणूक लढवली गेल्यास, जालना जिल्ह्यातली बदनापूरची जागा कोणाला सोडायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या बदनापूरमध्ये भाजपचा आमदार असला तरी आपला परंपरागत मतदारसंघ म्हणून शिवसेना या मतदारसंघावर दावा करील हे स्पष्ट आहे. या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे हे विद्यमान आमदार असून ते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे खास विश्वासू आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचाही या मतदारसंघावर प्रभाव असल्याने शिवसेना ही जागा सोडण्यासाठी तयार होईल अशी शक्यता नाही. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्याने यावेळी भाजप ही जागा सहजासहजी शिवसेनेला सोडणार नाही. या मतदारसंघाच्या इतिहासात हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातात अधिक काळ राहिलेला आहे. परंपरेने ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेना देखील या जागेवरून मागे हटणार नाही असंच सध्याचे चित्र आहे. एकूणच या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये घमासान निश्चित आहे.
साहजिकच युतीत बिघाडी झाली तर फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून प्रबळ उमेदवार मिळाल्यास हा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याचा देखील प्रयत्न होईल.
औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेल्या या विधानसभा मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न आहेत. बदनापूर शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-जालना जाणाऱ्या महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यासाठी बाह्यवळण रस्त्याची गरज असली तरी अद्याप तो झालेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांचे ही गंभीर प्रश्न आहेत. बदनापूर शहराला कायमस्वरूपी आणि निश्चित हमी असलेल्या पाणी पुरवठा योजनेची आवश्यकता आहे. जालना शहराजवळ काम सुरू असलेल्या ड्रायपोर्टचा काही भाग या मतदारसंघात येतो. ओद्योगीकरण नसल्यामुळे शेती हाच या मतदारसंघात प्रमुख व्यवसाय आहे. या मतदारसंघातील अंबड या तालुका मुख्यालय असलेल्या शहरातील पाणी आणि नागरी सुविधांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. साहजिकच हे प्रश्न निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचाराचे मुद्दे ठरतील यात शंका नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
New Zealand Squad For India Tour : रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
Embed widget