एक्स्प्लोर

Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार

Bacchu Kadu : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. लाडकी बहीणचे पैसे हे कुणाच्या बापाचे नाहीत, असं ते म्हणाले.

गोंदिया :  लाडकी बहीण योजनेचा पैसा कुणाच्या बापाचा नाही. सर्वसामान्य जनता कष्टाच्या पैशातून टॅक्स भरते त्या मेहनतीचा पैसा आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  याशिवाय बच्चू कडू यांनी प्रफुल पटेल यांना देखील सुनावलं आहे.

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी हे काँग्रेसच्या सभेमध्ये दिसत असतील तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला सांगा आम्ही त्यांची व्यवस्था करु असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू म्हणाले की हा पैसा का त्यांच्या बापाचा नाही. सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतात त्याचा हा पैसा आहे, त्यांच्या बापाचा हा पैसा नाही. लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती,आम्ही दुधाला भाव मागितला. आम्ही धान पिकाला भाव मागितला होता. पण ते सरकारला जमलं नाही. मतासाठी लाडकी बहीण योजना सुरू करता ही लाडकी बहीण तुम्हाला आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी खणखणीत टीका त्यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राज्य सरकारवर केली आहे. 

प्रफुल पटेल यांच्या घरासमोर आंदोलन करणार

प्रफुल पटेल यांनी धमक्या देऊ नये अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.  प्रफुल पटेल यांनी आम्हाला आंडु पांडू समजू नये, असं  बच्चू कडू  म्हणाले.   प्रफुल पटेल यांनी अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना उद्देशून म्हटले होते की या भागातल्या ठेकेदारांचे पैसे राज्य सरकार थांबवेल या वक्तव्याच्या समाचार घेताना बच्चू कडू म्हणाले की प्रफुल पटेल सारखा माणूस धमक्या देत असेल तर आम्ही  आंडू पांडू नाही. पुन्हा धमकी दिली तर आम्ही त्यांच्या घरावर जाऊ असं बच्चू कडू म्हणाले. 

प्रफुल पटेल यांनी समजावून घ्यावं त्यांनी मर्यादेत राहावं तर आम्ही मर्यादेत राहू... त्यांनी मर्यादा सोडली तर आम्ही त्याच्यापेक्षा भारी आहोत, असे टीकास्त्र त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर सोडले.  प्रफुल पटेल हे गेल्या काही दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की.. प्रफुल पटेल विकासासाठी ठाण मांडून बसले असते तर एवढी गरज पडली नसती. तुम्ही केंद्रीय मंत्री होते तुमच्याजवळ अलटून-पाटून तुमच्याकडे सत्ता आली. सत्ते शिवाय तुम्ही राहू शकत नाही पण विकास कामांचा डोंगर तुम्हाला उभारता आला नाही, अशी बोचरी टीका त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर केली.  

इतर बातम्या : 

Maha Vikas Aghadi Manifesto : 500 रुपयांत सिलिंडर ते 100 यूनिट मोफत वीज, मविआच्या जाहीरनाम्यातील 10 मोठी आश्वासनं!

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Vidhan Parishad Election 2026: जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'मिरगी' आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले...
अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'मिरगी' आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले...
Shivsena UBT Meeting : 'मातोश्री'वरील बैठकीची इनसाईड स्टोरी; फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचे खासदारांना महत्त्वपूर्ण निर्देश; मुद्दे आले समोर
'मातोश्री'वरील बैठकीची इनसाईड स्टोरी; फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचे खासदारांना महत्त्वपूर्ण निर्देश; मुद्दे आले समोर
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट! काँग्रेसचे हर्षजीत देशमुख थेट प्रचारात उतरणार नाही, नेमकं कारण काय?
अमरावती विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट! काँग्रेसचे हर्षजीत देशमुख थेट प्रचारात उतरणार नाही, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
Tukaram Mundhe :
"साहेब येणार आहेत...!" तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
Weather Update: सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
Embed widget