एक्स्प्लोर
प्रचाराचा शेवटचा आठवडा; सत्ताधारी-विरोधकांच्या सभांचा धडाका, केंद्रातील नेतेही राज्यात
आठवड्याभरात विधानसभा निवडणुकीच्या मतदान होणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या प्रचार सभाचां धडाका पाहायला मिळेल. युतीच्या उमेदवारांसाठी राज्यातील नेत्यांसोबतच केंद्रातील नेतेही प्रचारसभा घेणार आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ आठवडा उरला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील बड्या नेत्यांनीही प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात सात सभा होणार आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात सभा घेतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजची पहिली सभा यवतमाळमधील वणीत तर दुसरी सभा संध्याकाळी पुण्यात होणार आहे.
विरोधी पक्षांचाही प्रचारसभांचा धडाका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. पवारांच्या आज औरंगाबादेतल्या कन्नड आणि वैजापूरमध्ये, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि कोपरगाव इथे चार सभा आयोजित आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांच्याही आज परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये चार सभा होणार आहेत. तर, एमआयएमच्या उमेदवारासाठी असदुद्दीन ओवेसींची आज रात्री भिवंडीत सभा होणार आहे.
युतीच्या उमेदवारांसाठीकेंद्रातील नेतेही राज्यात
युतीच्या उमेदवारांसाठी राज्यातील नेत्यांसोबतच केंद्रातील नेतेही प्रचारसभा घेणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मुंबईतील गोरेगाव, मीरा रोड आणि चारकोप येथील सभांना संबोधित करतील. तर स्मृती इराणी यांच्या इंदापूर, सांगली आणि इचलकरंजीत प्रचारसभा होणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज लोणावळा, नाशिक, औरंगाबाद आणि नागपुरात प्रचारसभा होणार आहेत. तर तिकडे नागपुरात बसपाच्या उमेदवारासाठी बसपाप्रमुख मायावती प्रचारासाठी हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement