एक्स्प्लोर

Assembly Election 2026: आसामसह केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदानाची रणधुमाळी, 296 जागांसाठी 1,995 उमेदवारांच आज भवितव्य ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Assembly Election 2026: देशातील पुदुचेरी (Puducherry), केरळ (Kerala) आणि आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

Assembly Election 2026: देशातील तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुदुचेरी (Puducherry), केरळ (Kerala) आणि आसाममध्ये (Assam) सकाळी 7 वाजता मतदानाला (Assembly Election 2026) सुरुवात झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत लाखो मतदारांच्या स्वागतासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. आज आसाम, केरळ आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगाने तिन्ही ठिकाणी सर्व तयारी पूर्ण केली असून निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी व्यापक व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. Kerala Assembly Election 2026

Karnataka, Nagaland, and Tripura by-election: कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरातील एका जागेसाठी पोटनिवडणूक

विधानसभा निवडणुकीव्यतिरिक्त, आज कर्नाटकातील दोन, नागालँडमधील एक आणि त्रिपुरातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गोव्यातील एका जागेसाठी पोटनिवडणूकही नियोजित होती, परंतु उच्च न्यायालयाने तेथील पोटनिवडणुकीला स्थगिती दिली आहे. निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, आसाममध्ये 126 जागांवरील 722 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी 31,940 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. आसामच्या 35 जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने दीड लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेषतः सूक्ष्म-निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील मुख्य लढत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात असून, लाखो मतदार आपल्या भावी प्रतिनिधींना निवडण्यासाठी मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत.

Assembly Election 2026 : केरळमधील सर्व 140 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान, 883 उमेदवार रिंगणात

त्याचप्रमाणे, केरळमधील सर्व 140 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून, तेथे 883 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील 2.71 कोटी मतदार आज आपले मत देतील, ज्यात एलडीएफ तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे, यूडीएफ आपली गमावलेली जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि एनडीए राज्यात आपले खाते उघडण्याची आशा बाळगून आहे. दरम्यान, पुदुचेरीमधील 9.50 लाख मतदारही 294 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी ईव्हीएमवर मतदान करतील.

PM Modi : पंतप्रधान मोदींचे आसामच्या जनतेला आवाहन

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत आवाहन केलं कि, 'आसाम विधानसभा निवडणूक 2026 साठी मतदानाला सुरुवात होत असताना, मी आसामच्या जनतेला मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करतो. मला आशा आहे की राज्यातील तरुण आणि महिला मतदार उत्साहाने सहभागी होतील आणि ही निवडणूक लोकशाही व सार्वजनिक कर्तव्याचा उत्सव बनवतील.'

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget