एक्स्प्लोर
Advertisement
राजस्थान निवडणुकांसाठी भाजपाची चौथी यादी जाहीर
या यादीतून विद्यमान 9 आमदारांना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सुमेरपूरचे आमदार मदन राठोड, राजपूत समाजाचे नेते आमदार भवानी सिंह राजावतसह अन्य 7 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 24 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत विशेषकरुन कॉंग्रेस सोडून भाजपात आलेल्या महिलां नेत्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे.
काही तासांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ममता शर्मा यांना पिपल्दा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच कॉंग्रेसच्या बंडखोर नेत्या कल्पना राजेंना लाडपूरमधून मैदानात उतरवले आहे. कल्पना राजे या कॉंग्रसचे माजी खासदार इज्यराज सिंह यांच्या पत्नी आहेत.
या यादीतून विद्यमान 9 आमदारांना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सुमेरपूरचे आमदार मदन राठोड, राजपूत समाजाचे नेते आमदार भवानी सिंह राजावतसह अन्य 7 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच जयपूरचे महापौर अशोक लहोटींना सांगानेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने चौथ्या यादीत सुजानगढमधून खेमाराम मेघवाल, दौसातून शंकर शर्मा, आणि गंगापूर शहरातून मानसिंह गुर्जर या विद्यमान आमदारांचा समावेश केला आला आहे. एकूणच या यादीत कॉंग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आलं असल्याचं स्पष्ट होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement