एक्स्प्लोर

Anil Deshmukh: भाजपमध्ये गेलो असतो तर मंत्री झालो असतो, तसं न केल्याने मला जेलमध्ये टाकलं; अनिल देशमुखांचा भाजपवर घणाघात  

Anil Deshmukh: राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती 100% खरी आहे. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.   

Maharashtra Assembly Election 2024 नागपूर:  राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती 100% खरी आहे. त्यात सत्यता आहे, कारण ईडी सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सरकारमध्ये सामील व्हावं लागलं, याची सर्वांना कल्पना आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) साहेबांवर ही दबाव होता, ते जेल मधून बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की पुन्हा एकदा सर्व चौकशीला सामोरे जायचं आणि पुन्हा जेलमध्ये जायचं. म्हणून या सर्व लोकांनी भाजपच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतेला. असा घणाघाती आरोप राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.   

.... तर आज मी मंत्री झालो असतो 

अशाच पद्धतीचा दबाव माझ्यावरही होता. मात्र मी फडणवीस यांना सांगितलं होतं की मी तुमच्या दबावाला मानणार नाही. तुम्ही वाटल्यास ईडी सीबीआय लाऊन मला जेलमध्ये टाका. मात्र, उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधीही तुम्ही पाठवलेल्या एफीडेव्हिट वर स्वाक्षरी करणार नाही आणि जसं मी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी सीबीआय आणि ईडीचे पथक आले. मी पण यांच्याप्रमाणे बीजेपी बरोबर गेलो असतो, तर आज मी मंत्री झालो असतो. मात्र मला यांच्यासोबत जायचं नव्हतं, म्हणून मला जेलमध्ये टाकलं. असेही अनिल देशमुख  म्हणाले. राष्ट्रवादी मधील अनेकांवर ईडी, सीबीआयचा दबाव भाजप आणि फडणवीस आणि टाकलं होता. तसेच दिल्लीच्या दबावाखाली हे सर्व चालू होतं, असा आरोपही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. 

पुस्तक लिहिणारे राजदीप सरदेसाई काय म्हणाले?

जे पुस्तक आहे, लोकांनी ते पुस्तक वाचावं. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात काय घटनाक्रम घडले, त्याचं स्पष्टीकरण या आहे. छगन भुजबळ यांनी ही स्पष्टीकरण दिलेल आहे. जनतेने पुस्तक वाचायला पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर त्यांना विचारा... राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार लेखक म्हणून जी वस्तूस्थिती आहे, ती लिहली, असं राजदीप सरदेसाई यांनी सांगितले. छगन भुजबळ माझ्यासोबत बोलत असताना अनेक लोक त्यावेळी सोबत होते. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. हे राजकारणाचे प्रश्न आहे. राजकारण ज्यांना करायचा त्यांना करू द्या मी त्यात पडणार नाही. या पुस्तकात एक चॅप्टर महाराष्ट्रावर आहे. हे पुस्तक महाराष्ट्रावर नाही. मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यावर काही म्हणायचं नाही हे पुस्तक वाचा. त्यात कुठल्याही पक्षाचा काही नाही.. ज्या ज्या लोकांचं मत होतं.. हे मत इथे मांडलेला आहे. छगन भुजबळ यासह अनेक विषयावर बोलले. पुस्तकाचा एक पॅरेग्राफ घेऊ नका. एका पॅरेग्राफवर राजकारण होतं. पूर्ण पुस्तक वाचा. पुस्तकांचा टाइमिंग काहीच नाही. 2014, 2019 आणि 2024 मी नोव्हेंबर महिन्यात पुस्तक लिहिलेले आहे. याचा आणि निवडणुकीचा टाइमिंगच्या काहीही संबंध नाही, असंही राजदीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं

व्हिडीओ

Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा
Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Embed widget