एक्स्प्लोर

Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; आचारसंहिता लागू, कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं असून आचारसंहिताही लागू झाली आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात.

Andheri East Bypoll Election 2022 : सध्या राज्याच्या राजकारणात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची (Andheri East Bypoll Election) रणधुमाळी दिसून येत आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं असून प्रत्येक पक्षानं आपापली कंबर कसली आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळं शिवसेनेच्या दृष्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke)  यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणातील बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. 

शिवेसेनेतील दोन गट ठाकरे समर्थक असलेला शिवसेना : 'उद्धव बाळासाहेब ठाकरे गट' आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' असलेला शिंदे गट. हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेतील बंडाचा प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. 

निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबरपासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. 

कसा असेल निवडणूक कार्यक्रम? 

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : 7 ऑक्टोबर 2022 
नामनिर्देशन पत्रं सादर करण्याची अखेरची तारीख : 14 ऑक्टोबर 2022 
नामनिर्देशन पत्रांची छाननी : 15 ऑक्टोबर 2022 
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2022 
मतदानाचा तारीख : 3 नोव्हेंबर 2022 
मतमोजणीचा तारीख : 6 नोव्हेंबर 2022 
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा तारीख : 8 नोव्हेंबर 2022 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 1 जानेवारी 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे. 

पोटनिवडणुकीत भाजप-शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) युती 

अंधेरी पूर्व मतदार संघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना रंगणार आहे. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपनं आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे गटानं इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपनं आपल्याकडे घेतल्यानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Andheri east Assembly Election 2022 : अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget