एक्स्प्लोर

अंधेरी पोटनिवडणुकीत कोण ठरणार वरचढ? उद्धव ठाकरेंसह शिंदे-फडणवीसांचीही प्रतिष्ठा पणाला

ANDHERI EAST BYPOLL 2022 : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची आणि चिन्हबदलानंतरची ही पहिलीच निवडणूक.

ANDHERI EAST BYPOLL 2022 : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची आणि चिन्हबदलानंतरची ही पहिलीच निवडणूक. मात्र, सेनेतल्या दोन्ही गटांसोबतच ही परिक्षा भाजपचीही असणार आहे...अनेकांना यात आपल्या क्षमता सिद्ध कराव्या लागतील...आगामी महापालिका निवडणूकीची आणि राजकिय डावपेचांची लिटमस टेस्ट अंधेरी पोटनिवडणूक होणार आहे. 

काही वर्षांपूर्वी बांद्रा पूर्व पोटनिवडणूकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मातोश्रीच्या अंगणातच सेना विरुद्ध राणे या पोटनिवडणूकीतल्या संघर्षाची पुन्हा आठवण करुन दिली जातेय. सध्या संघर्षाचं मैदान आहे अंधेरी आणि राणेंऐवजी सेनेसमोर आहे शिंदे आणि भाजपचं आव्हान.

पोटनिवडणूकीतली पहिली परिक्षा - शिंदे-भाजप सरकारचीच
सेनेतली सर्वात मोठी बंडखोरी आणि त्यानंतरच्या सत्तांतरापाठोपाठ नव्या सरकारबद्दल जनमत नेमकं काय सांगतंय याची चाचणी या पोटनिवडणूकीत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वजण आपली ताकत पणाला लावणार आहेत. 

पोटनिवडणूकीतली दुसरी परिक्षा - खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची
या पोटनिवडणूकीकरता शिवसेना पक्षाचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण मिळावं म्हणून शिंदेंनी जंग जंग पछाडलं..अखेर धनुष्यबाण गोठलं आणि शिंदेंच्या हाती ढाल तलवार आली...पण,सध्या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तलवार चालवायला संधी नाही त्यांना केवळ ढाल घेऊन भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं लागणार...ठाकरे गटाच्या उमेदवार रुजुता लटकेंना शिंदे गटात ओढण्याच्या प्रयत्नांची चर्चा असो किंवा रुजुता लटकेंविरोधात नुकतीच दाखल झालेली भ्रष्टाचाराची तक्रार असो यामागे शिंदे गटाचा हात होता अशी राजकिय वर्तृळात चर्चा आहे...त्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकण्यापेक्षाही ठाकरे गटाचा उमेदवार पडणं हे शिंदेंसाठी जास्त महत्वाचं आहे...

पोटनिवडणूकीतली तीसरी परिक्षा - उद्धध ठाकरेंची 
सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर वर्षा बंगला सोडतांना सहानुभूतीची मोठी लाट उद्धव ठाकरेंच्या बाजुनं होती...तशीच लाट या पोटनिवडणूकीतही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही...सेना फुटली तरी सेना संपु देणार नाही हा निर्धार जर उद्धव ठाकरेंना खरा करुन दाखवायचा असेल तर ही पोटनिवडणूक शिवसेना ठाकरे गटाकरता पक्षाचं भविष्य ठरवणारी असेल. 

पोटनिवडणूकीतली चौथी परिक्षा -  मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेलांची
मुंबई भाजपची जबाबदारी आता आशिष शेलारांकडे आहे..महापालिका निवडणूकीकरता भाजपचे मुंबईतील रणनितीकार म्हणूनही त्यांच्याच कडे पाहिलं जातंय...२०१७ मध्ये आशिष शेलारांच्याच रणनितीखाली भाजपनं मुंबईत मुसंडी मारली होती...मात्र, दरम्यानच्या काळातल्या राजकिय उलथापालथी आणि सध्याचं वातावरण पहाता आशिष शेलारांकरता अंधेरी पोटनिवडणूकीतला विजय भाजपकडे खेचून आणणं अनिवार्य ठरतंय...तर आणि तरच भाजपच्या आगामी महापालिका निवडणूकीच्या रणनितीची कमान आशिष शेलारांच्या हाती राहील...तसंच, भाजपची उमेदवार निवड सार्थ ठरवून राजकिय कारकिर्दीत नवं पान जोडण्याकरता मुरजी पटेलांनाही ही निवडणूक प्राणपणानं लढावी लागेल 

पोटनिवडणूकीतली पाचवी परिक्षा - अनिल परब आणि रुजुता लटकेंची
पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढवण्याची संधी रुजुता लटकेंना मिळतेय खरी...पण केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन चालणार नाही...तर संघर्ष करणा-या स्त्रीच्या भूमीकेतही त्यांना वावरावं लागेल. सोबतच, रुजुता लटकेंचा राजिनामा आणि उमेदवारीकरता महापालिका प्रशासनापासून कोर्टापर्यंत झगडणा-या अनिल परबांनाही आपल्या अचूक नियोजनाची चुणूक दाखवावी लागेल...शिवसेना ठाकरे गटाच्या संकटकाळात अनेकजण ठाकरेंची साथ सोडत असतांना जर हा विजय अनिल परबांनी ठाकरे गटाकरता खेचीन आणला तर आगामी काळात पुन्हा एकदा अनिल परब ठाकरेंचे संकटमोचक ठरतील.  अनेक अर्थांनी आणि अनेकांकरता अटीतटीची असणारी अंधेरी पोटनिवडणूक ही कुणाच्या गटाला आशेचा किरण दाखवतेय आणि कुणाला राजकिय अंधारात ढकलतेय हे काही दिवसातच कळेल.   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : नरेंद्र मोदींचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन, भारत दौऱ्याचं आमंत्रण, ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं, नरेंद्र मोदींनी पुतिन यांना फोन फिरवला, थेट भारत दौऱ्याचं आमंत्रण
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
Nagpur Pune Vande Bharat : नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : नरेंद्र मोदींचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन, भारत दौऱ्याचं आमंत्रण, ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं, नरेंद्र मोदींनी पुतिन यांना फोन फिरवला, थेट भारत दौऱ्याचं आमंत्रण
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
Nagpur Pune Vande Bharat : नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
दादा म्हणाले, पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, मुख्यमंत्री म्हणतात, लगेच निकड नाही, भविष्यात विचार करु!
दादा म्हणाले, पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, मुख्यमंत्री म्हणतात, लगेच निकड नाही, भविष्यात विचार करु!
Embed widget