एक्स्प्लोर

Andheri By Election : भाजप उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात? ठाकरे गटाचा आक्षेप

Andheri By Election : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतील भाजप (BJP) उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या उमेदवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अक्षेप घेतला आहे.

Andheri By Election : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतील भाजप (BJP) उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अक्षेप घेतला आहे. 2017 पासून सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी असताना त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला? असा आक्षेप शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांची घेतला आहे. नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय निवडणूक  आयोगाकडे ठाकरे गटाकडून याबाबतचे पुरावे देखील देण्यात येणार असल्याचे संदीप नाईक यांनी म्हटले आहे. 

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खोटी कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने पटले यांच्यावर ही कारवाई केली आहे. परंतु, असे असताना देखील त्यांचा निवडणुकीचा अर्ज कोणत्या नियमानुसार स्वीकारला? असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केलाय.  

2017 पासून सहा वर्षांची निवडणूक लढण्यास बंदी असताना मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला? असा प्रश्न संदीप नाईक यांनी उपस्थित केलाय. निवडणूक लढण्याच्या परवानगीबाबत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला?  या दोन्ही प्रकाराची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक असताना ही माहिती पटेल यांच्याकडून लपवण्यात आली आहे. निवडणूक लढण्यास बंदी असल्याने त्यांचा मतदान करण्याचा अधिकार देखील काढून घ्यावा अशी मागणी संदीप नाईक यांनी केलीय. याबरोबरच पटेल यांच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवली आहे, असा आक्षेप नाईक यांनी घेतला आहे. बोगस चेक देण्याबाबत पटेल यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील नाईक यांनी दिली आहे.  

संदीप नाईक यांनी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने हे  सर्व आक्षेप फेटाळले आहेत. यावेळी संपीद नाईक यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केलीय.  भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना भाजपने उमेदवारी का दिली? असा प्रश्न उपस्थित करत आपल्या दिवंगत आमदाराच्या पत्नी विरोधात अशा उमेदवाराला पाठिंबा कसा देताय? असा प्रश्न नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. 

आक्षेप असताना देखील मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते. शिवाय आक्षेप असूनही कारवाई होत नाही, त्यामुळे या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशारा संदीप नाईक यांनी दिला आहे. 
 
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरही आक्षेप 

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर देखील आक्षेप घेण्यात आलाय.  अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून लटके यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतलाय. ऋतुजा लटके यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ईपीएफओ बॅलन्स अकाउंट नंबर आणि त्यामधील शिल्लक दाखवली नाही. त्यामुळे त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. परंतु,  निवडणूक आयोगाने मिलिंद काबळे यांनी ही मागणी फेटाळली आहे.   

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
Embed widget