एक्स्प्लोर

Amit Thackeray: मोठी बातमी : अमित ठाकरेंना समर्थन देऊन निवडून देऊ, आशिष शेलारांची इच्छा, महायुती माहीममध्ये पाठिंबा देणार?

Ashish Shelar On Amit Thackeray: महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी, असं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे.

Amit Thackeray Mahim Vidhan Sabha: ठाकरे घराण्यातील मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहे. 

अमित ठाकरेंसाठी (Amit Thackeray) ही निवडणूक सोपी नसेल, कारण या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा रंगली असताना भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. 

सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल. हिंदुत्वाची भूमिका घेणारे आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल तरी महायुतीने नाते जपावे, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं. त्यामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार की नाही?, हे आगामी दिवसात स्पष्ट होणार आहे.

आपल्याच घरातील अमित ठाकरे...- आशिष शेलार

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. महायुतीमध्ये एक नातं आपण जपायला हवे, असं मला वाटतं असं आशिष शेलार म्हणाले. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन (निवडून) देऊ असे मला वाटतेय, असंही आशिष शेलार यांनी सांगितले. 

अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा- संजय राऊत

वेगवेगळ्या पक्षाच्या विविध भूमिका असतात. ही निवडणूक महायुद्धासारखी लढली जाईल. महाराष्ट्रद्रोह्यांना मदत कोणी करतं हे जनता बघेल, असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलागा आहे. निवडणुकीत लढावं लागतं, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या विधानामुळे अनेकांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उतरवला उमेदवार-

अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही?, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. 

संबंधित बातमी:

Amit Thackeray: धाकटे बंधू अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?, Video:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi News : साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Diksha Bhumi Nagpur :  पंतप्रधान मोदींकडून संघाच्या स्मृती मंदिरासह दिक्षाभूमीला वंदनABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10AM 30 March 2025PM Narendra Modi Nagpur Reshim Bagh :  पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला केलं अभिवादनPM Narendra Modi Nagpur :  मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi News : साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
Embed widget