एक्स्प्लोर

Ajit Pawar Baramati By-Election: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल

Ajit Pawar Baramati By-Election: अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

Ajit Pawar Baramati By-Election: अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे (Ajit Pawar Death Plane Crash) रिक्त झालेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील (Baramati assembly constituency) जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदणीकृत असलेले मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतील.

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये बारामती विधानसभा मतदारसंघासाठी हा विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Ajit Pawar Baramati By-Election: प्रारूप मतदारयादी 9 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार

या कार्यक्रमानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येतील.

Ajit Pawar Baramati By-Election: 10 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवार 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या अंतिम यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना संपूर्ण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचनांचे आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Sharad Pawar : कुटुंबावर दु:खाचा डोंगर,आजोबांचं नातवांना मार्गदर्शन, शरद पवारांची रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत चर्चा

Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget