Sharad Pawar : कुटुंबावर दु:खाचा डोंगर,आजोबांचं नातवांना मार्गदर्शन, शरद पवारांची रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत चर्चा
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा एक फोटो समोर आला आहे.

पुणे (बारामती) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा बारामतीमधील एक फोटो समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत 28 जानेवारीला निधन झालं. यामुळं पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला उपस्थित न राहता बारामतीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा आजचा एक फोटो समोर आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्पनवर भेटीसाठी बारामतीतील नागरिक भेट देत होते. आज या सांत्वनपर भेटीचा शेवटचा दिवस होता.
बारामतीमधील सहयोग बंगला येथे आज शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य देखील सांत्वनपर भेटीसाठी उपस्थित होते.
या दरम्यानचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांचा आहे. यावेळी शरद पवार पार्थ पवार आणि रोहित पवार यांना मार्गदर्शन करत असल्याचं पाहायला मिळतं.
अजित पवारांचं स्मारक उभारलं जाणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उभारण्यात येणार आहे. या संदर्भात देखील चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांची पार्थ पवार, जय पवार यांनी भेट घेतली होती.बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांचं स्मारक कशा प्रकारचं असावं या संदर्भातील चर्चा सुरु आहेत.
आज बारामती इथल्या सहयोग सोसायटीमध्ये अजित दादा पवार यांच्या निधनानंतर आज श्रद्धांजली ला पवार कुटुंब एकत्रित पाहायला मिळाले.पार्थ पवार आणि रोहित पवार, शरद पवार यांच्याशी चर्चा करतानाचा फोटो समोर आला आहे.
शरद पवार यांनी कालच माध्यमांसोबत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं हे स्वागतार्ह असल्याचं म्हटलं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना त्यांचं विमान बारामतीच्या विमानतळाजवळ दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यात अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा मृत्यू झाला होता.

























