एक्स्प्लोर

Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली

Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आज सकाळी मतदान केले.अजित पवार यांची सकाळी लवकरच मतदान करण्याची परंपरा पाळली.

Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज (शनिवार) मतदान पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजता राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतदानाला सुरुवात झाली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी त्यांची परंपरा पाळली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी लवकरच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे मतदानासाठी पोहोचले. या दोघांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार हे कायमच सकाळी लवकर कामाला सुरुवात करायचे. ते मतदानालाही सकाळीच मतदान केंद्रावरच पोहोचायचे. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवली.

आणखी काहीवेळाने अजित पवार यांची आई आशा पवार यादेखील मतदानासाठी येणार आहेत. तर युगेंद्र पवार, शर्मिला पवार आणि राजेंद्र पवार यांनी बारामतीच्या कन्हेरी  जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. आमदार रोहित पवार, पत्नी कुंती, आई सुनंदा वडील राजेंद्र पवार यांच्यासह पिंपळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर शरद पवार  यांचे  मतदान माळेगाव नगरपरिषदेत व सुप्रिया सुळे यांचे मतदान बारामती नगरपालिकेत असल्याने ते आज मतदान करणार नाहीत. (Baramati Election 2026)

यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्यादृष्टीने या निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 11 नगरपालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असल्या तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सरशी झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिसरी फेरी रंगली होती. यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, अजित पवार निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला येत असतानाच त्यांचे विमान कोसळले होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता.

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात प्रचार पूर्णपणे थंडावला होता. कोणत्याही राजकीय पक्षाने पुणे जिल्ह्यात जाहीर सभा घेतली नव्हती. केवळ वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला होता. त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळणार का, हे बघावे लागेल. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होते. दोन्ही राष्ट्रवादी इतक्या एकजीव झाल्या असताना अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Ambadas Danve : भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget