एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट येणार? अवघे 4 सदस्य असणाऱ्या अजितदादा गटाने शड्डू ठोकला

Maharashtra Politics: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 तारखेला निवडणूक होत आहे. त्यानंतर विधानपरिषदेतील रिक्त असलेले सभापतीपद भरले जाईल. त्यासाठी महायुतीकडून कोणता उमेदवार निश्चित होणार, हे पाहावे लागेल.

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या सभापतीची निवड सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातच केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे (Vidhan Parishad  Election 2024) सभापतीपद रिक्त आहे. मात्र, आगामी राजकारणाच्यादृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने ते भरले जाईल, असे सांगितले जाते. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस असणार, हे अपेक्षितच होते. विधानपरिषद सभागृहात 78 पैकी 27 जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे.  मात्र, आता या शर्यतीत विधानपरिषदेत अवघे चार सदस्य असलेल्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) उडी घेतल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.  विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे असे चार सदस्य आहेत.

सत्तेत सहभागी होताना विधान परिषदेत सभापतीपद देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळेच अजितदादा गटाने विधान परिषद सभापती पदावर दावा सांगितला आहे.

विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी संपणार आहे आणि पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र जाणे अपेक्षित आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही सभापती पदावर दावा करण्यात आला आहे. भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून विधानपरिषद निवडणुकीची तारीख निश्चित करुन सर्वसहमतीने एकच उमेदवार निवडला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. 

मविआच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांची भेट

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. विधानपरिषदेतील सभापतीपद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहे, असे सांगण्यात आले. यावेळी राज्यपालांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. 

आणखी वाचा

विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये...; कोण किती भाडं मोजतंय; शिंदे गट, ठाकरे की भाजप?

आमदारांमध्ये खेळीमेळीचे वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न, सर्वजण एकाच मजल्यावर, आदित्य ठाकरेही हॉटेलमध्ये राहणार, निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा खास प्लॅन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 March 2025Special Report | Satish Bhosle | हतबल 'खाकी',मोकाट 'खोक्या' पत्रकारांना सापडतो पण पोलिसांना का नाही?Special Report | Beed Akka | गँग्स ऑफ बीड! रोज एक आका, रोज एक गँग; कार्यकर्ते की गुंड?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
Embed widget