अहमदनगर, धुळ्यात मतदारांचा कौल कुणाला?
धुळे महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील निवडणुकीत धुळ्यात 62 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर अहमदनगरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
धुळे/अहमदनगर : धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठीचं मतदान आज पार पडलं. धुळे महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील निवडणुकीत धुळ्यात 62 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर अहमदनगरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
एकीकडे 5 राज्यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतानाच राज्यात धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकडे राज्यांचं लक्ष लागलं आहे. धुळे आणि अहमदनगरमधील स्थानिक पत्रकारांनी दिलेला कल पाहता धुळ्यात स्वपक्षीयांनाच आव्हान देणारे अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अपेक्षीत यश मिळणार नाही. तर भाजपला मात्र चांगल्या जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीलाही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केला आहे.
अहमदनगरमध्ये कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज पत्रकारांनी व्यक्त केला आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सर्वसाधारण समान जागा मिळण्याची शक्यता स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली आहे. अहमदनगरमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
स्थानिक पत्रकार आणि मतदारांच्या अंदाजानुसार कोणत्या पक्ष किती यश मिळेल याची आकडेवारीही समोर आली आहे.
धुळेकरांचा कौल
पक्ष जागा लोकसंग्राम पक्ष 5 भाजप 29 शिवसेना 7 काँग्रेस-राष्ट्रवादी 28 इतर 5 एकूण 74
अहमदनगरकरांचा कौल
पक्ष जागा शिवसेना 21 भाजप 20 राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी 22 इतर 5 एकूण 68
संबंधित बातम्या
Dhule Election Update : 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज
Ahmadnagar Election Update : 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान
महापालिका निवडणूक : श्रीपाद छिंदमच्या भावाने ईव्हीएम मशीनची पूजा केली
महापालिका निवडणूक : धुळ्यात आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक, मतदानाला सुरुवात