Ahilyanagar District Nagarpalika Election Result 2025: विखे-पाटलांनी राहाता नगरपालिकेचा गड राखला, नेवासामध्ये गडाखांचा गड आला पण सिंह गेला; संगमनेरमधील निकाल काय? जाणून घ्या
Ahilyanagar District Nagarpalika Election Result 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता नगरपालिकेचा गड विखे पाटलांनी राखला आहे. 20 पैकी 19 जागेवर भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झालाय.

Ahilyanagar District Nagarpalika Election Result 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता नगरपालिकेचा गड विखे पाटलांनी राखला आहे. 20 पैकी 19 जागेवर भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झालाय. तर नेवासा नगरपालिकेत माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. कारण 17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालाय.
अहिल्यानगर जिल्हा,
1) राहाता नगरपालिकेवर विखे पाटलांचा झेंडा...
विखे पाटलांनी गड राखला...
भाजपचे _ स्वाधीन गाडेकर_ बहुमताने विजयी..
20 पैकी 19 जागेवर भाजप सेनेचा विजय...
विरोधकांना मिळाली अवघी एक जागा...
2) देवळाली प्रवरा नगरपालिका...
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली..
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार _ सत्यजित कदम _ विजयी..
जनतेने दुसर्यांदा दिली नगराध्यक्ष पदाची संधी...
14 जागेवर भाजपचे नगरसेवक विजयी...
काॅग्रेसचा चार जागांवर विजय...
3) नेवासा नगरपालिका...
माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला..
17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी..
मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय..
6 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी..
1 जागेवर आम आदमी पार्टीचा विजय...
4) राहुरी नगरपालिकेवर तनपूरेंची सत्ता...
माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या शहर विकास आघाडीचा विजय...
नगराध्यक्षपदी बाबासाहेब मोरे बहुमताने विजयी..
तनपूरेंनी आपला गड राखला...
24 पैकी 17 जागेवर तनपूरेंचे उमेदवार विजयी...
7 जागेवर भाजपच्या नगरसेवकांचा विजय...
5) संगमनेर नगरपालिका..
बाळासाहेब थोरातांनी आपला गड राखला...
संगमनेर सेवा समीतीच्या नगराध्यक्ष उमेदवार मैथीली तांबे सोळा हजार चारशे मतांनी विजयी..
शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ पराभूत..
विरोधकांना मिळाली केवळ एकच जागा...
30 पैकी 27 जागेवर संगमनेर सेवा समितीचा विजय
थोरात तांबे यांचं नगरपालिकेवर निर्विवाद वर्कस्व....
संगमनेर सेवा समितीचे 27 नगरसेवक विजयी.. .एक शिवसेना नगरसेवक विजयी तर दोन अपक्ष विजयी...
6) कोपरगाव नगरपालिका
भाजपाचे पराग संधान नगराध्यक्ष पदी विजयी
राष्ट्रवादी AP गटाच्या उमेदवाराचा अवघ्या 399 मतांनी पराभव...
अटीतटीच्या लढतीत भाजपाचा विजय...
काळे कोल्हे संघर्ष असलेली निवडणूक...
एकूण जागा 30
भाजपचे 19 तर राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक विजयी...
7) शिर्डी नगरपरिषद
शिर्डीत भाजपच्या जयश्री विष्णू थोरात यांचा दणदणीत विजय...
शिर्डी पालिका भाजपच्या ताब्यात...
23 जागांपैकी भाजपचे 15, शिंदे शिवसेना 3, अजित पवारांची राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक विजयी.. तर 3 जागांवर अपक्षांची बाजी...
शिर्डी भाजपच्या जयश्री थोरात नगराध्यक्षपदी...
8) श्रीरामपूर नगरपरिषद निवडणूक
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे विजयी...
34 नगरसेवकांपैकी
20 काँग्रेस
10 भाजप युती
3 शिवसेना शिंदे
अपक्ष एक
श्रीरामपूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ....
माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचा मोठा पराभव..
इतर महत्त्वाच्या बातम्या




















