एक्स्प्लोर

Aheri Assembly Constituency : 'बाप.. बाप होता हैं', धर्मराव बाबा आत्रामांनी विजयानंतर लेकीला डिवचलं? घराबाहेर लावले बॅनर्स

Aheri Assembly Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम यांची आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली.

Aheri Assembly Constituency: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची धामधूम संपली. निकाल लागला. मात्र त्याचे पडसाद अद्यापही सर्वत्र दिसून येत आहेत. काही ठिकाणी एकात परिवारातील सदस्य निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते, काही जिंकले तर काही हरले. मात्र त्यावरून डिवचण्यासाठी पोस्टर आणि टीका केल्या जात असल्याचं चित्र आहे. विदर्भातील अहेरी मतदार संघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी असा सामना झाला. त्याचबरोबर त्या ठिकाणी वडील आणि मुलगी एकमेकांच्या विरोधात उभे होते. यामध्ये वडीलांचा विजय झाला त्यानंतर आता बाप आखिर बाप होता है अशा स्वरूपाचे बॅनर लागले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांची आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवारांची राष्ट्रवादी  यांच्यात प्रमुख लढत झाली. तर धर्मरावबाबा आत्राम यांचा पुतण्या राजे अंबरीशराव आत्राम हा देखील निवडणुकीच्या रिंगणात होता. अहेरी मतदार संघात कौटुंबिक सामना रंगला होता. या निवडणूकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांचा विजय झाला. त्यावेळी देखील त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना बाप अखेर बाप असतो अशी  प्रतिक्रीया दिली होती. त्यानंतर आता धर्माबाब आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या विजयानंतर त्यांच्या नागपूरच्या निवास स्थानासमोर 'बाप आखिर बाप होता है' असे होर्डिंग लागले आहेत.

अहेरी विधानसभा मतदार संघात धर्माबाबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी त्यांची कन्या भाग्यश्री यांचा पराभव केला. प्रचारादरम्यान मुलगी व वडिलांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे शेवटी विजयानंतर 'बाप आखिर बाप होता है', हा संदेश धर्मबाबा यांच्या होर्डिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला आहे. 'बाप आखिर बाप होता है', मंत्री धर्माबाब आत्राम यांच्या विजयानंतर त्यांच्या नागपूरच्या निवास स्थानासमोर लागलेले हे होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. 

2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम (Dharmarao Baba Atram) विजयी झाले होते. त्यांना 60 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे अंबरीशराव राजे अत्राम यांचा पराभव केला होता. आता त्यांना 53978 मते मिळाली. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना 35569 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजे अंबरीश यांनी 37121 मते घेतली. मात्र, धर्मराव बाबा अत्राम  यांच्या विजयानंतर आता मतदारसंघात पोस्टर वॉर दिसून येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray Shivsena : मनपा निवडणुकीसाठी ठाकरे सक्रियSuresh Dhas on Santosh Deshmukh : छोटा आका आत गेला; वाल्मिक कराड प्रमुख सुत्रधार - सुरेश धसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  10 AM : 24  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Embed widget