एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MNS: मनसेच्या पराभवानंतर ठाण्यातील कार्यालयाबाहेर शुकशुकाट, व्यापाऱ्यांनी पुतळे उभे करुन डाव साधला

MNS: मनसेच्या बंद कार्यालयांसमोर कार्यकर्ते नाही तर पुतळे दिसत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) निकाल 23 तारखेला हाती आले. या निकालानुसार महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं आहे. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील या निवडणुकीत मोठं अपयश आलं आहे. मनसे अध्यक्ष राजे ठाकरे  यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. 
मनसेने 125 उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेला विधानसभा निवडणुकीत भोपळा देखील फोडता आला नाही. तर मुंबईतील माहीम मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला. हा पराभव पक्षाने आणि नेत्यांनी मान्य केला. मात्र, आता पक्षांची कार्यालये, कार्यकर्ते सध्या नाराज झाल्याचं दिसून येत आहे. अशातच मनसेच्या बंद कार्यालयांसमोर कार्यकर्ते नाही तर पुतळे दिसत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात मनसेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर मनसेचे ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालय बंद दिसून आलं. समोर कार्यकर्ते नाहीत. पोस्टर नाही की काही नाही, मात्र, याचा फायदा शेजारील व्यावसायिकांनी उठवला असून, त्यांनी आपल्या दुकानातील कपड्यांचे पुतळे मनसेच्या बंद कार्यालयासमोर उभे केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या दृश्यांची चर्चा होऊ लागली आहे. कार्यालयाच्या शेजारी असलेल्या दुकानदारांनी त्यांनी आपल्या दुकानातील कपड्यांचे पुतळे मनसेच्या बंद कार्यालयासमोर उभे केल्याचे दिसून येत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल  झाले आहेत.

फोटो व्हायरल झाल्यानंतर मनसेचं उत्तर

मनसेच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांच्या जागी पुतळ्याची गर्दी असा फोटो व्हायरल झाल्यानंतर मनसेचं उत्तर दिलं आहे. 'आपल्या पक्षाची व आपल्या नेत्याची बदनामी करणाऱ्या लोकमत दैनिकांचा निषेध करत कृपया सर्वांनी आपल्या पेजवर फेसबुक इन्स्टा व्हाट्सअप ग्रुप सगळीकडे प्रत्येक पदाधिकारी महाराष्ट्र सैनिकांनी टाकायचे आहे पूर महाराष्ट्राला कळू दे या खोटारड्या पत्रकाराचा चेहरा', असं म्हणत मनसेच्या नेत्यांनी पोस्ट शेअर करत खरी परिस्थिती सांगितली आहे. 

 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश

शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण महाविकास महाविकास घाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसा आहे. भाजपला आजपर्यंतचं सर्वातं मोठं यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आता महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू आहेत. 

 एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

आज सकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा (Eknath Shinde Resigned) सोपवला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Embed widget