एक्स्प्लोर

Yugendra Pawar: अजितदादांविरोधात पराभवानंतर युगेंद्र पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! सुरू केला आभार दौरा; मत पडताळणीबाबत केलं मोठं वक्तव्य

Yugendra Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा काढलेला आहे.

बारामती: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्यांने पराभव झाला. युगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामध्ये युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवारांना (Ajit Pawar) 1,96,640 मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. त्यानंतर आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा (Yugendra Pawar) पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा काढलेला आहे.

 या आभार दौऱ्याच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी काटेवाडी मधून केली. तर दुसरीकडे अजित पवारांचं (Ajit Pawar) अद्यापपर्यंत अभिनंदन केलं नाही, परंतु तुमच्या माध्यमातून अभिनंदन करतो. सातत्याने त्यांना दिल्लीला जावं लागत आहे. त्याच्यामुळे वेळ भेटला नाही, ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस मी त्यांचे अभिनंदन करेल असा खोचक टोला युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला आहे. तर तसेच त्यांनी मत पडताळणीवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत पैशाचा वापर झाला. दहशतीचे वातावरण होतं असा आरोप देखील युगेंद्र पवार यांनी केला आहे. 

गावोगावी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मानणार आभार 

अजित पवार (Ajit Pawar) यांचं मी अभिनंदन करतो आणि निवडणुका म्हटलं तर हार-जीत हे होत असतं. आमची पहिली वेळ होती. आम्ही निष्ठेच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने उभे राहिलो. आमचे सर्व कार्यकर्ते हे नवीन आहेत. सर्वजण तरुण आहेत. तरीदेखील आम्ही सर्वांनी चांगली टक्कर दिली आणि सर्वत्र परत एकदा गेलं पाहिजे अशी भावना आमच्या सर्वांची होती. त्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि ज्या लोकांनी मदत केली नाही. तिथे परत एकदा त्यांच्या गावात जाऊन भेट द्यायची गरज होती. ते द्यायचे आम्ही प्रयत्न करत आहे. परत एकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि निवडणुका शेवटी येत असतात जात असतात पण विचार महत्त्वाचे असतात. आम्ही विचारांसोबत राहिलो. 

आम्ही शरद पवारांसोबत राहिलो त्याला पण किंमत असते फक्त माझे एकट्याचा निकाल जर वेगळा असता तर मग ठीक आहे. समजून घेऊ शकलो असतो. माझ्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मोठी ताकत होती. सत्ता त्यांच्या हातात होती. सत्ता संस्था सर्व त्यांच्यासोबत होते. तरी पण आपण चांगली मतं मिळवली पण अख्या महाराष्ट्रामध्ये असा निकाल लागेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. पण ते तसं झालं आणि हे सगळं होत असताना इतकी मतं आम्हाला मिळाली तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही काम करत राहू लोकांमध्ये जात राहू आणि पाच वर्ष कष्ट घेत राहू आणि येणारा काळा आपलाच असेल, असा विश्वास एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.  

 एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावा लागेल 

मत पडताळणी बाबत बोलताना युगेंद्र  पवार म्हणाले, एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावा लागेल तो मी मान्य केला आहे. पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला तो अधिकार दिला आहे. पाच टक्के ईव्हीएम पडताळणी करू शकता. आज अख्या महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आहे जो आमची पक्ष आहे जे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः आम्हाला असं वाटलं चेक करायला काय हरकत आहे आणि तो अधिकार आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला आहे त्यामुळे आज आम्ही ते पडताळणी करण्याची मागणी केली आहे असं ते म्हणालेत. 

त्यामध्ये काहीतरी झाला असेल असा संशय वाटतोय का या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, असं वाटत आहे. कारण फक्त बारामतीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगले नेते जुने नेते पराभूत झाले आहेत. फक्त मी एकटा असतो तर मग ठीक होतं. कुठेतरी मी ते स्वीकारलं असतं शेवटी पुढच्या उमेदवाराची ताकद खूप मोठी होती. पण मोठे मोठे दिग्गज नेते जर त्यांच्या मतदारसंघात पडत असतील, तर वीस तीस वर्ष जर त्यांच्या मतदारसंघात काम करून ते पराभूत होत असतील तर तिथे कुठेतरी संशयास्पद वाटतं त्यामुळे आम्ही पडताळणी करण्याची मागणी केली आहे असंही युगेंद्र पवार पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना अभिनंदन केलं का यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, नाही अजून पक्षाच्या मिटींग चालू होत्या निकाल लागल्यानंतर तीन चार दिवस मला मुंबईत राहावं लागलं. कारण पक्षाच्या काही बैठका कार्यक्रम होते ते देखील त्यांच्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यांना आता दिल्लीला जावं लागत आहे आणि त्यांना तिथे सरकार स्थापन बद्दलच्या बैठका घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला मला वेळ मिळाला नाही. जर मला त्यांना कुठे भेटता आलं किंवा अचानकपणे भेट झाली तर मी 100% त्यांना शुभेच्छा देईन असेही देवेंद्र पवार म्हणालेत. 

या निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचा दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेचा देखील इम्पॅक्ट या निवडणुकीवर झाल्याचा दिसून येत आहे ही पराभवाची कारणे असू शकतात असेही युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा - Baramati Assembly Constituency : अजितदादांनी निवडणूक जिंकली, पण पिक्चर अभी बाकी है! आक्षेप घेत युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात; नेमकी काय मागणी केली?

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget