Gujarat Assembly Elections : महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी, गुजरात निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता? जाणून घ्या ABP C-Voter चा सर्वे
Gujarat Assembly Elections : उद्या संध्याकाळी म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे. निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी एबीपी न्यूजसाठी अंतिम सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या पक्षाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी मोठ-मोठे नेते मैदानात उतरले आहेत. यावेळी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडून बेरोजगारी, भ्रष्टाचार, समान नागरी कायद्याचा मुद्दा उचलत आहेत. तर सत्ताधारी भाजपकडून विकास आणि दहशतवादाचा मुद्दा पुढे केला आज आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील आणि 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक होत आहे.
उद्या संध्याकाळी म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे. निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी एबीपी न्यूजसाठी अंतिम सर्वेक्षण करण्यात आले आहे. गुजरातमधील सर्व 182 जागांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये 19 हजार 271 लोकांचे मत जाणून घेण्यात आले आहे. 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात निवडणुकीसाठी लोकांना कोणचे मुद्दे महत्वाचे वाटतात याबाबत जाणून घेण्यात आले आहे.
सी-व्होटरने ओपिनियन पोल दरम्यान गुजरातच्या जनतेला प्रश्न विचारला की, गुजरात निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? या प्रश्नासाठी अतिशय आश्चर्यकारक उत्तरे समोर आली आहेत. सर्वेक्षणात 38 टक्के लोकांनी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे. 18 टक्के लोकांनी मूलभूत सुविधा ही मोठी समस्या असल्याचे सांगितले. तर 13 टक्के लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हा मुद्दा मोठा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. 5 टक्के लोकांनी भ्रष्टाचार, 4 टक्के महागाई, 4 टक्के कोरोनामध्ये केलेले काम, 3 टक्के कायदा आणि सुव्यवस्था, 2 टक्के राष्ट्रीय समस्या आणि 13 टक्के इतर समस्या सर्वात मोठे असल्याचे सांगितले.
गुजरातमधील सर्वात मोठा मुद्दा कोणता?
बेरोजगारी : 38 टक्के
महागाई : 4 टक्के
मूलभूत सुविधा : 18 टक्के
कोरोना काम : 4 टक्के
शेतकरी : 13 टक्के
कायदा आणि सुव्यवस्था : 3 टक्के
भ्रष्टाचार : 5 टक्के
राष्ट्रीय समस्या : 2 टक्के
इतर : 13 टक्के
महत्वाच्या बातम्या
Gujarat Elections 2022: पाकिस्तानने भारतात 2 बॉम्बस्फोट केले, तर तिथे 20 स्फोट होतील: हेमंत बिस्वा शर्मा