एक्स्प्लोर

मी निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंची घोषणा, वरळीतून विधानसभेच्या मैदानात उतरणार

माझ्या विरोधात कुणीही लढू द्या. त्यांना अधिकार आहे. मात्र मला भीती नाही. माझ्यासाठी ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. ही मी घेतलेली मोठी उडी आहे. मात्र मला चिंता नाही कारण आपण मला पडू देणार नाहीत, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई : आजपर्यंत शिवसेना आणि शिवसैनिकांनी सामान्य लोकांसाठी राजकारण आणि समाजकारण केलं. याच समाजकारणासाठी मी निवडणूक लढवणार  आहे, अशी घोषणा युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगितलं. वरळीमध्ये आयोजित शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. माझ्या विरोधात कुणीही लढू द्या. त्यांना अधिकार आहे. मात्र मला भीती नाही. माझ्यासाठी ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. ही मी घेतलेली  मोठी उडी आहे. मात्र मला चिंता नाही कारण आपण मला पडू देणार नाहीत, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी राजकारणात आलो असल्याचं यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले. हा निर्णय माझ्या स्वत:साठी नाही. मला जनतेसाठी आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी निवडणूक लढवायची आहे. हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मला प्रदूषण मुक्त महाराष्ट्र, सुंदर स्वच्छ महाराष्ट्र घडवायचा आहे. मी माझ्यासाठी नाही तर जनतेसाठी निवडणूक लढवणार आहे. मला मुख्यमंत्री बनायचं आहे म्हणून नाही तर लोकांच्या न्याय हक्कांसाठी निवडणूक लढायची आहे. गेली दहा वर्ष मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे.  संपूर्ण महाराष्ट्रासाठी मला काम करायचं आहे, असेही ठाकरे म्हणाले. जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने मला महाराष्ट्रभरातून खूप प्रेम मिळाले. जनआशिर्वाद यात्रेदरम्यान मी निवडणूक लढवावी की नाही, याबाबत मतं जाणून घेतली. यावेळी मला अनेकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला असेही ते म्हणाले. मला लहानपणापासूनच राजकारणाची आवड आहे. आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत लहानपणापासून समाजकारण आणि राजकारण जवळून पाहिले आहे, असेही आदित्य यावेळी म्हणाले. आदित्य यांच्या रुपात ठाकरे घराण्यातला पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यावेळी व्यासपीठावर आदित्य यांची आई रश्मी ठाकरे, लहान बंधू तेजस ठाकरे देखील हजर होते. मात्र तिकीटवाटपाच्या कामात व्यस्त असल्यानं उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Karale Nagpur MLC Election Result 2026: मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला

Embed widget