(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Exit Polls 2019 Lok Sabha Elections Live Update | एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोल LIVE
LIVE
Background
Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकसभेच्या 542 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. केंद्रात कोणाची सत्ता येणार, याचा फैसला होईलच, मात्र 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालांचा अचूक आणि विश्वसनीय अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
11 एप्रिलला लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली. आज (19 मे) सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्याने लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.
पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं
कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान
पहिला टप्पा - आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबार
दुसरा टप्पा - आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी,
तिसरा टप्पा - आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमण दीव
चौथा टप्पा - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
पाचवा टप्पा - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
सहावा टप्पा - बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल
सातवा टप्पा - बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, चंदिगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल