एक्स्प्लोर

APAAR Card : विद्यार्थ्यांसाठी 'वन नेशन वन स्टुडंट आयडी' किती महत्त्वाचं? अर्ज कसा करायचा?

Benefits of One Nation One ID : वन नेशन, वन आयडी म्हणजेच अपार कार्डचा (APAAR Card) विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, ते कसे कार्य करेल आणि त्यासाठी नाव नोंदणी कशी करावी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

Benefits of One Nation One ID : AAPAR म्हणजेच ऑटोमॅटिक परमनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री हे एक असं आयडी कार्ड असेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती सामाविष्ट असेल. त्यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत त्याने जे काही शिक्षण घेतले आहे त्याची प्रत्येक माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. हे अभ्यासक्रम कुठे केले गेले, कोणत्या वर्गात किती गुण मिळाले, यासारख्या सर्व तपशील या आयडी क्रमांकावरून उपलब्ध होतील. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक फायदे मिळतील.

एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार

AAPAR आयडी हे एक प्रकारची विद्यार्थी ओळख प्रणाली असेल ज्यामध्ये त्याच्याबद्दलचे सर्व तपशील दिले जातील. तुम्हाला कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा वर्ग बदलायचा असेल, किंवा एखादा कोर्स अर्धवट सोडावा लागला असेल (एंट्री-एक्झिट पॉलिसी अंतर्गत), या सर्व कारणांसाठी हे आयकार्ड वापरलं जाऊ शकते.

हा एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असेल, त्याची संपूर्ण सिस्टीम तयार झाल्यावर केवळ एक नंबर टाकल्यावर  उमेदवाराच्या सर्व शैक्षणिक नोंदी समोर येतील. पालकांच्या संमतीने यासाठी मुलांची नोंदणी केली जाईल आणि प्रत्येकाकडे अपार कार्ड असेल.

शिक्षक, महाविद्यालये आणि विद्यार्थांसाठी हे कार्ड 

विद्यार्थ्याचे महाविद्यालय, शाळा आणि त्याच्या शिक्षणाच्या संपूर्ण नोंदी या एकाच ठिकाणी मिळतील.असे म्हणता येईल की विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाची म्हणजे प्राथमिक ते जिथे जिथे त्याने शिक्षण घेतले आहे तिथपर्यंतचा हा संपूर्ण रेकॉर्ड असेल. त्याला कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल किंवा इतरत्र कुठेही अर्ज करायचा असला तरीही यामुळे त्याला खूप मदत होईल. त्याला त्याची सर्व कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी लागणार नाहीत. त्याच्याबद्दलची सर्व माहिती युनिक नंबरवरून उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार

नोकरीपासून ते कुठेही प्रवेश घेण्यापर्यंत सर्वत्र तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. जेव्हा तुमचा सर्व डेटा एकाच ठिकाणी असेल, तेव्हा तुम्हाला कागदपत्रे सर्वत्र घेऊन जाण्याची गरज नाही किंवा ते हरवण्याची भीती नाही. येथे विद्यार्थ्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल आणि तो पालकांच्या संमतीने शाळांमध्ये तयार केला जाईल. पालकांनाही त्यांना हवे तेव्हा त्यांची नोंदणी मागे घेण्याचा अधिकार असेल.

नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत त्याची सूचनाही देण्यात आली होती आणि आता लवकरच यासंदर्भात काम सुरू केले जाईल. अपार कार्ड बनविण्याची जबाबदारी शाळांवर देण्यात आली आहे. येथील विद्यार्थ्यांच्या डेटाच्या सुरक्षेबाबत अनेकजण प्रश्न उपस्थित करत असले तरी विद्यार्थ्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील असे सरकारचे म्हणणे आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Embed widget