एक्स्प्लोर

UGC NET : यूजीसी नेट जून 2025 चे सर्टिफिकेट जारी, JRF आणि असिस्टंट प्रोफेसर पात्र उमेदवारांनो, 'ही' स्टेप फॉलो करा

UGC NET June 2025 Certificate : निकालानुसार एकूण 1,28,179 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. त्यापैकी 5,269 उमेदवारांना ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र मानले आहे

UGC NET June 2025 Certificate : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA - National Testing Agency) ने यूजीसी नेट जून 2025 परीक्षा (UGC NET June 2025 Exam) यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे सर्टिफिकेट जारी केले आहे. आता पात्र उमेदवार आपले सर्टिफिकेट अधिकृत संकेतस्थळावरून सहज डाउनलोड (Download Certificate) करू शकतात.

ही परीक्षा 25 जून ते 29 जून 2025 दरम्यान कंप्युटर आधारित मोड (Computer Based Test - CBT) मध्ये पार पडली होती. यामध्ये देशभरातून तब्बल 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर सुमारे 7.5 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. याचा निकाल जुलै 2025 मध्ये जाहीर करण्यात आला होता.

जेआरएफ (JRF) सर्टिफिकेट जाहीर

निकालानुसार एकूण 1,28,179 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. त्यापैकी 5,269 उमेदवारांना ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (Junior Research Fellowship - JRF) आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र मानले आहे. तर 54,885 उमेदवार केवळ असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) आणि पीएचडी प्रवेशासाठी योग्य ठरले आहेत.

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट (Official Website) वर जाऊन अर्ज क्रमांक (Application Number), जन्मतारीख (Date of Birth) आणि सिक्युरिटी पिन टाकून लॉगिन करावे. त्यानंतर सर्टिफिकेट पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून प्रिंट घेता येईल.

सर्टिफिकेट कसे डाउनलोड कराल?

सर्टिफिकेट डाउनलोड करताना अडचण आल्यास उमेदवारांनी थेट NTA शी संपर्क साधावा. त्यासाठी ईमेल आयडी ugcnet@nta.ac.in आणि ecertificate@nta.ac.in उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यूजीसी नेटचे सर्टिफिकेट उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे ठरवणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याचा उपयोग असिस्टंट प्रोफेसर पदाच्या भरतीत (Assistant Professor Recruitment) आणि पीएचडी प्रवेश प्रक्रियेत (PhD Admission Process) होतो.

यूजीसी नेट म्हणजे काय आणि का महत्त्वाचं?

यूजीसी नेट (UGC NET) म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (University Grants Commission National Eligibility Test). ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून तिचे आयोजन राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) करते. या परीक्षेचा उद्देश म्हणजे भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी योग्य असिस्टंट प्रोफेसर आणि संशोधनासाठी पात्र उमेदवारांची निवड करणे. जे उमेदवार या परीक्षेत पात्र ठरतात त्यांना उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापनासोबतच संशोधनाच्या संधी मिळतात.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget