एक्स्प्लोर

Teacher Transfer Policy : शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण जाहीर, शिक्षकांना रुजू अथवा कार्यमुक्त करण्याचे अधिकार जि.प. सीईओंना!

Teacher Transfer Policy : ज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण ग्रामविकास विभागाने जाहीर केलं आहे.

Teacher Transfer Policy : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण ग्रामविकास विभागाने जाहीर केलं आहे. यात बदली झालेल्या शिक्षकांना (Teacher) रुजू अथवा कार्यमुक्त करुन घेण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) देण्यात आले आहेत. तर बदलीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. त्यामुळे सरकारच्या पातळीवर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे बदल नवीन धोरणात करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदांकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही!

या बदल्या राज्यस्तरावर होणार असल्या, तरी त्या त्या जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनलाईन अर्ज संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात करावा लागणार आहे. शिवाय बदलीसाठी इच्छुक शिक्षकांचे विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून रोस्टर(बिंदू नामावली) तपासल्यानंतरच होणार असल्याचं नवीन धोरणात स्पष्ट करण्यात आलं आहे. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी यापूर्वी असलेलं शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत. नवीन धोरणानुसार जिल्हा परिषदांकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट करण्यात आल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षक बदली धोरणातील महत्त्वाच्या बाबी

- बदलीसाठी जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या 31 मे अखेर किमान 5 वर्षे सलग सेवा होणं आवश्यक आहे.
- तो शिक्षक त्या पदावर कायम असणं आवश्यक आहे.
- जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा असेल.
- बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती आणि बदलीच्या जिल्ह्यात रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी 15 दिवसांचा कालावधी असेल
- एक महिन्यानंतर बदली रद्द करता येणार नाही
- बदली रद्द करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाच असेल.
- बदली आदेश रद्द करणे, हा संबंधित शिक्षकाचा हक्क नसेल. याबाबत सरकारकडे अपील, विनंती करता येणार नाही.
- बदलीसाठी दबाव आणल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही होईल.
- पदन्नोत किंवा पदस्थापना होऊन वेतनोन्नती झालेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत तसंच वेतनोन्नती परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्यांचा बदल्यांसाठी विचार केला जाईल.
- जर पती व पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास दाम्पत्यापैकी एकाला त्याचा जोडीदार ज्या जिल्ह्यात कार्यरत असेल, तिथे बदली मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल. या जिल्ह्यात जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील. दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget