NTA NEET 2021 : नीट परीक्षा 13 भाषांमध्ये होणार; तर कुवेतमध्ये नवीन परीक्षा केंद्र सुरु
NEET Exam 2021 : वैद्यकिय प्रवेश परीक्षा NEET आता 13 भाषांमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
NEET Exam 2021 : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा एनईईटी NEET(UG) 2021 आता 13 भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की, पश्चिम आशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुवेतमध्ये नवीन नीट परीक्षा केंद्र सुरु केलं आहे.
NEET(UG) 2021 परीक्षा पहिल्यांदाच 13 भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये पंजाबी, मल्याळम यांसारख्या भाषा जोडण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET(UG) परीक्षा आता हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, आडिशा, गुजराती, तेलगु, मल्याळम, कन्नड, तमिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान, वैद्यकिय प्रवेश परीक्षा NEET(UG) 2021 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 13 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता NTA च्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर सुरु झाली आहे. कोरोना संबंधित नियमांचं पालन करत नीट परीक्षा 12 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.
नीट पीजी परीक्षा 11 सप्टेंबरला होणार; एनटीएकडून वेळापत्रक जाहीर
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा एनईईटी पीजी (NEET PG) 11 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सोमवारी एनटीएने एनईईटी यूजी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. नुकतीच कोरोना साथीच्या आजारामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय मंत्र्यांचे ट्वीट
केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांनी मंगळवारी संध्याकाळी ट्वीट केले की, आम्ही 11 सप्टेंबर 2021 रोजी एनईईटी पदव्युत्तर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तरुण वैद्यकीय इच्छुकांना माझ्या शुभेच्छा.
यापूर्वी कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती
यापूर्वी 18 एप्रिल रोजी कोविड साथीच्या आजारामुळे एनईईटी-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशभरातील कोविड 19 प्रोटोकॉलनंतर एनईईटी (पीजी) परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केले. परीक्षेदरम्यान, सर्व उमेदवारांना मास्क घालावे लागतील आणि बसण्याची योजना सोशल डिस्टन्स पाळून तयार केली जाईल.
NEET UG परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु
एनईईटी यूजी 2021 साठी नोंदणी प्रक्रिया 13 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे. ही परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेतली जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात. सोमवारी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एनईईटी यूजी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI