एक्स्प्लोर

NEET Exam Result 2020 : ओडिशाच्या शोएब आफताबने रचला इतिहास! नीट परीक्षेत 720 पैकी 720

NEET Exam Result 2020 : ओडिशाच्या शोएब आफताबने इतिहास रचला असून नीट परीक्षेत त्याने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. शोएबला 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. 100 टक्के गुण मिळवणारा शोएब पहिलाचं विद्यार्थी ठरला आहे.

नवी दिल्ली : नीट 2020 (NEET 2020) चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत शोएब आफताबने (Shoyeb Aftab) इतिहास रचला आहे. त्याने परीक्षेमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत. असे करणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. यापूर्वी कोणालाही शंभर टक्के मार्क मिळवता आले नाहीत. शोएबने 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत. तर मुलींमध्ये दिल्लीची आकांक्षा सिंग पहिली तर देशात दुसरी आली आहे. महाराष्ट्रतून आशिष जांते पहिला तर तो देशात 19 वा आला आहे.

यावर्षीचा नीट परीक्षेचा कट ऑफ मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. यावर्षी जनरल कॅटेगरीसाठी 50 टक्के म्हणजे 720 पैकी 147 मार्क्सचा कटऑफ आहे. तर ओबीसी, एससी,एसटी कॅटेगरीसाठी हा कट ऑफ 40 टक्के म्हणजे 720 पैकी 113 मार्क्सचा असणार आहे. मागील वर्षी हा जनरल कॅटेगरी साठी 720 पैकी 134 गुणांचा तर ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीसाठी कट ऑफ 720 पैकी 107 गुणांचा होता. यावर्षी एकूण 13,66,945 नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी 7,71,500 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

तर मुलींमध्ये दिल्लीची आकांक्षा सिंग पहिली तर देशात दुसरी आली आहे. महाराष्ट्रतून आशिष जांते पहिला तर देशात 19 वा आला आहे. यावर्षीचा नीट परिक्षेचा कट ऑफ मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. यावर्षी जनरल कॅटेगरीसाठी 50 टक्के म्हणजे 720 पैकी 147 मार्क्सचा कटऑफ. तर ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीसाठी हा कट ऑफ 40 टक्के म्हणजे 720 पैकी 113 मार्क्सचा असणार. मागील वर्षी हा जनरल कॅटेगरी साठी 720 पैकी 134 गुणांचा  तर ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीसाठी कट ऑफ 720 पैकी 107 गुणांचा होता. यावर्षी एकूण 13,66,945 नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी 7,71,500 विद्यार्थी प्रवेशासाठी  पात्र ठरले आहेत.

ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्वीट करत देखील माहिती दिली होती.

NEET Result 2020: रिझल्ट असा चेक करा

नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी हे करा - सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या - यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा - त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा - नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल. - आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या. 12 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टानं कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असं म्हटलं होतं. तसंच या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला घोषित करावा असंही कोर्टानं म्हटलं होतं. कोविडमुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी दिली एक संधी सुप्रीम कोर्टानं 13 सप्टेंबर रोजी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबर रोजी एकदा परीक्षा देण्याचा निर्णय दिला होता. देशात नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी 3,843 परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एकूण 15.97 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र काही विद्यार्थी कोरोना आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळं परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यांना 14 ऑक्टोबर रोजी एक संधी दिली होती. ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020 परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडली होती. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेत ही परीक्षा घेतली होती. देशभरातील जवळपास 15 लाख विद्यार्थी 'नीट' मेडिकल प्रवेश परीक्षेला बसले होते. महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षेसाठी देशात 15.97 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन वाढवत 3843 इतकी केली होती. तर प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या 24 वरुन 12 करण्यात आली होती. ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड राज्यातील सहा मंत्र्यांनी याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनळं यंदा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली. यावरून अनेकदा राजकारण ही रंगलं, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget