महाविकास आघाडीच विजयाचे फटाके फोडणार, रोहिणी खडसे निवडून येणार, एकनाथ खडसेंनी व्यक्त केला विश्वास
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील निकाल हाती येतील. महाविकास आघाडीच्या विजयाचे फटाके फुटतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे.
Eknath Khadse : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील निकाल हाती येतील. महाविकास आघाडीच्या विजयाचे फटाके फुटतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे. मागील निवडणुकीमध्ये रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचा 1800 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाच्या कारणांचा आम्ही शोध घेतला असून या निवडणुकीमध्ये असं होणार नाही, असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे.
राज्यात महागाई आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
सध्या राज्यात महागाई आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. यामुळं जनता त्रस्त असल्याचे खडसे म्हणाले. यामुळेच जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईल असे खडसे म्हणाले. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कौल मिळेल आणि महाविकास आघाडीचे फटाके फुटतील असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
यावेळी देखील रोहिणी खडसेविरुद्ध चंद्रकांत पाटील अशीच लढत
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची लढत होणार आहे. गेली 40 वर्ष एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे होता. एकनाथ खडसे यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते. मात्र, एकनाथ खडसेंचा हा गड भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा शुभारंभ हा मुक्ताईनगरमध्ये केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरून रोहिणी खडसे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास मुलीच्या विजयाबाबत माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांच बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात रोहिणी खडसेंचा पराभव झाला होता. आता यावेळी पुन्हा रोहिणी खडसे या मैदानात उतरल्या आहेत. मात्र, यावेळी खडसेंनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळं यावेळी सर्वाचं लक्ष या लढतीकडं लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
पक्षाचा आदेश पाळणार, मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंची चंद्रकांत पाटलांना साथ, रोहिणी खडसेंसमोर आव्हान
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI