एक्स्प्लोर
Advertisement
SSC Results 2020 | दहावीचा निकालही लवकरच, निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावी बोर्डाचा निकाल सुद्धा लवकरच जाहीर होईल. दहावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आहे.
मुंबई : आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावी बोर्डाचा निकाल सुद्धा लवकरच जाहीर होईल. दहावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुंबई बोर्डाचे सचिव संदीप संगवे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं.
बारावीचा निकाल लागल्यानंतर संगवे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, बारावीचा निकाल लावणं हे एक मोठं आवाहन मुंबई बोर्डासाठी होतं. कारण ज्याप्रकारे लॉकडाऊन, त्यात कटेन्मेंट झोन. या सगळ्यात आम्हाला उत्तरपत्रिका गोळा करून त्या एकत्र कराव्या लागल्या. मग त्या मॉडरेटर, चीफ मॉडरेटर यांच्याकडे गेल्या. मग संकलन करून स्कॅन करून पुण्याला पाठवल्या गेल्या.
Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल जाहीर, इथं पाहा रिझल्ट
पण यात झोकून देऊन बोर्डाने काम केलं आणि लवकर निकाल कसा लवकर जाहीर करता येईल यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाली. अनेक जण घरी राहिले, पण युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आपले मार्कशीट कधी मिळणार? हे बोर्डाच्या वेबसाईट वर कळवलं जाणार आहे.
Maharashtra HSC Results | मार्कांबाबत समाधानी नाहीत, उत्तरपत्रिकेची कॉपी हवीय, रिचेकिंग करायचंय, मग 'हे' करा!
ज्याला रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. शिवाय मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा ऑनलाईन मिळेल. त्यामुळे कॉलेज किंवा बोर्ड कार्यालयात गर्दी करू नका, असं आवाहन त्यांनी केलंय.
Maharashtra HSC Results | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के, मागील वर्षीच्या तुलनेत प्रगती
दहावीचा निकालही लवकरच लागणार असून निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या शालेय शिक्षणमंत्री
बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले होते.
सीबीएसईचा बारावी आणि दहावीच्या निकालात एक दिवसाचं अंतर होतं. CBSE ने सोमवारी बारावीचा आणि बुधवारी दहावीचा निकाल जाहीर केला होता.
दरम्यान, बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2020 Declared) झाला. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement