एक्स्प्लोर

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार? पाहा संपूर्ण माहिती

SSC HSC Exam : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1आणि बारावी परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी तज्ञांशी विचारविनिमय करून, सदर परीक्षांचा कालावधी व स्वरुप निश्चित करण्यात आले आहे.

SSC HSC Exam : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व तत्सम तज्ञांशी विचारविनिमय करूनसदर परीक्षांचा कालावधी व स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. त्यासोबतच परीक्षा सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पाडण्याकरिता विद्यार्थ्यासाठी काही विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याची माहिती गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. 

परीक्षेचा कालावधी
प्रचलित पद्धतीनुसार बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान व दहावीची परीक्षा एक मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.  बारावीची लेखी परीक्षा चार मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे. 

विषय, माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या - 
मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरुपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. बारावीसाठी 356 तर दहावीसाठी 158 प्रश्नपत्रिका असतील. 

परीक्षेत विविध घटकांचा सहभाग -
सदर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिरक्षक, मुख्य नियामक नियामक परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी अशा घटकांचा समावेश असतो.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना  निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता प्रचलित ऑफलाईन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी पुढील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

परीक्षा केंद्रे
प्रचलित पद्धतीनुसार मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थी ज्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तेथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. त्यामुळे त्यांना परिचित वातावरण मिळून परीक्षा देण्यास सुलभता वाटेल. तसेच परीक्षेसाठी कमी प्रवास करावा लागेल.

परीक्षेची वेळ 
विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे जादा वेळ तसेच 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.

अभ्यासक्रम 
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच अभ्यासक्रमात 25% कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचे आयोजन 75% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येतील.

प्रात्यक्षिक परीक्षा
कोरोमुळे बहुसंख्य शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित प्रात्यक्षिककार्ये पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत सवलत देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन शक्य न झाल्यास प्रात्यक्षिकाऐवजी लेखन कार्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाईल. बारावी प्रात्यक्षिक कार्य हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान 40% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. दहावी शाळांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान 40 % प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. 

विशेष सवलत
कोणताही विद्यार्थी आजारी पडल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन प्रात्यक्षिक / सबमिशन करून शकल्यास लेखी परीक्षेनंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.

सुरक्षात्मक उपाययोजना
सर्व परीक्षा केंद्रांवर कोरोनामुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर विद्यार्थ्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीयमदत पुरवली जाईल.

विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका -
कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर किमान एकते दीड तास अगोदर उपस्थित राहणेबाबत कळविण्यात येईल. विद्यार्थ्याला दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाईल. यामुळे ती सोडविण्याबाबत त्याला नियोजन करता येईल.

विद्यार्थ्याच्या आरोग्यास प्राधान्य -
सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी व संबंधित घटकांकरिता कोविड- १९ संदर्भात शासन व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य असेल. याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील..

विभागीय मंडळनिहाय helpline
मंडळाच्या परीक्षेशी संबंधित सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत विभागीय मंडळनिहाय helpline सुरु करण्यात येईल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget