(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HSC Exam : इंग्रजीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाने उत्तर छापलं.. कॉपीमुक्त अभियानाचा डांगोरा पिटणाऱ्या परीक्षा बोर्डाचा पराक्रम
HSC Exam English Examination: बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तर छापून आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जाण्याची शक्यता आहे.
HSC Exam English Examination: आजपासून राज्यात महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. प्रश्नपत्रिकेतील या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर, बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
नेमकं काय झालं?
बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने आता बोर्डाला या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे
इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक 3 इंग्रजी कवितेववर आधारित होता. प्रश्न क्रमांक 3 मधील उप प्रश्नात घोळ झाला असल्याचे समोर आले आहे.
> A3 - 2 मार्कांसाठीचा प्रश्न ( यामध्ये प्रश्नाऐवजी उत्तर पत्रिका तपासणाऱ्याला सूचना दिली आहे.)
> A4 - 2 मार्कांसाठी प्रश्न ( यामध्ये कवितेवर आधारित प्रश्नचे उत्तरच देण्यात आले.)
> A5- 2 मार्क ( उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या आहेत. )
या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे.
आजपासून बारावीची परीक्षा
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील. सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रा जवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 100% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी झाडासाठी घेतली जाणार शिवाय चित्रीकरणही केलं जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- HSC Examination : अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; पनवेलमधील धक्कादायक घटना
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI