नोकरीच्या शोधात असाल तर जरा इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आहेत चांगल्या संधी
Job Majha : सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तसेच ठाण्यातील बी.आर. हरणे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये भरती सुरू आहे. जाणून घेऊया त्यासंबंधी सविस्तर माहिती...
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तसेच ठाण्यातील बी.आर. हरणे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये भरती सुरू आहे. जाणून घेऊया त्यासंबंधी सविस्तर माहिती...
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
विविध पदांच्या एकूण २४७ जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट – प्रोजेक्ट इंजिनिअर
एकूण जागा – ६७
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी (B.E.)/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech)/बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc), २ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – ३२ वर्षांपर्यंत
दुसरी पोस्ट - ट्रेनी इंजिनिअर
एकूण जागा – १६९
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयातील B.Tech/B.E/B.Sc पदवी, किमान ६ महिन्यांचा अनुभव
वयोमर्यादा – २८ वर्षांपर्यंत
तिसरी पोस्ट - ट्रेनी ऑफिसर
एकूण जागा – ११
शैक्षणिक पात्रता – MBA, किमान ६ महिन्यांचा अनुभव
वयोमर्यादा – २८ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट - www.bel-india.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment advertisement वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातींची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर
पोस्ट - फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा – ७२
शैक्षणिक पात्रता – फिजिशियनसाठी M.D.Medicines/ DNB, ऍनेस्थेटिस्ट साठी M.D, वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, BAMS ही पात्रता हवी.
तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट - chanda.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन या कॉलममध्ये विशेष कंत्राटी पदभरती जाहिरात क्रमांक १ यावर क्लिक करा. जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बी.आर. हरणे आयुर्वेद महाविद्यालय ठाणे
पोस्ट - प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता).
एकूण जागा – ४८
शैक्षणिक पात्रता – आयुर्वेदातील पदवी/ पदव्युत्तर पदवी
नोकरीचं ठिकाण – ठाणे
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – ८ फेब्रुवारी २०२२
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य, बी.आर. हरणे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, कराव-वांगणी, तालुका-अंबरनाथ, जिल्हा-ठाणे ४२१ ५०३
अधिकृत वेबसाईट – br harne ayurved. in
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI