Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उच्चांक, देशात दर काय?
Petrol-Diesel Price Today 2 March 2022 : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Petrol-Diesel Price Today 2 March 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तरिदेखील राष्ट्रीय बाजारात मात्र पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. गेल्यात चार महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या तणावामुळे अमेरिकेसह अनेक देशांत पेट्रोलच्या किमतींमध्ये (Petrol Price) वाढ झाली आहे. तसेच इंधनाचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरल पार पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे भाव 110 डाॅलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑईल 110 डाॅलर प्रति बॅरेल तर डब्ल्यूटीआय ऑईलच्या किंमती 108 डाॅलर प्रति बॅरेल पार पोहोचल्या आहेत. डब्ल्यूटीआय ऑईल ऑगस्ट 2014 नंतर पहिल्यांदाच 108 डाॅलर प्रति बॅरेल पार पोहोचले आहेत. परंतु, भारतात जवळपास चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Prices) स्थिर आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरु आहेत. 10 मार्च रोजी पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे 10 मार्चपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.