Indapur Assembly constituency: तिरंगी लढतीमुळे इंदापूर मतदारसंघात चुरस वाढली, पक्षफुटीचा फटका कोणाला बसणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?
Indapur Assembly constituency: इंदापुरमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
पुणे: राज्यात मतदानाची झाल्यानंतर सर्व राज्याच लक्ष आता आजच्या निकालाकडे लागलं होतं. राज्यातल्या काही भागात हायव्होल्टेज लढती पाहायला मिळाल्या आहेत. त्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अनेकजण याबद्दल अंदाज व्यक्त करत होते. पण दिवसेंदिवस त्यांच्या अंदाजातही बदल होताना दिसून आला होता.आता मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या बिग फाईट्सपैकी एक म्हणजे इंदापूर. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली आहे. इंदापुरमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून प्रवीण माने रिंगणात होते.
इंदापूर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत येथे झाली आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पक्षात प्रवेश करत तिकिटही दिलं. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी मिळणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. पाटील यांना उमेदवारी देताच लोकसभेवेळी सुप्रिया सुळे यांना मदत करणारे आप्पासाहेब जगदाळे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
तर दुसरीकडे सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, कोणत्या पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. प्रवीण माने यांनी लोकसभेवेळी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. लोकसभेनंतर आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी ते शरदचंद्र पवार गटात गेले होते. परंतु उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांना जाहीर झाल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2019 चा निकाल काय?
1995 ते 2004 पर्यंत इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा होता. हर्षवर्धन पाटील यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. इंदापुरातील राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. 2009 मध्ये, हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. या वेळीही त्यांना विजय मिळाला. मात्र, 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांनी विजय मिळवला. 2019 मध्येही दत्तात्रेय भरणे यांनी विजय मिळवला. 114,960 मतांनी बाजी मारली. यावेळी होणारी विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI