एक्स्प्लोर

ऑल द बेस्ट! ICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा आज निकाल; मार्कशीट कशी डाऊनलोड कराल?

काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) द्वारे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल आज (सोमवार, 6 मे 2024) जाहीर केला जाणार आहे.

Indian Certificate of Secondary Education Board Exam 2024 : मुंबई : आयसीएसईच्या (ICSE Result 2024) दहावी-बारावी परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आयसीएसईच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. युनिक आयडी, इंडेक्स नंबर देऊन हा निकाल पाहता येईल. या वर्षी बारावीचे पेपर फुटल्याच्या संशयावरून दोन परीक्षा मंडळाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. विद्यार्थ्यांना गुणांविषयी शंका असल्यास पेपर रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करता येईल. त्याकरिता एक ते दीड हजार रुपये शुल्क आकारलं जाईल. 

काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) द्वारे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल आज (सोमवार, 6 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. ICSE बोर्डानं CISCE बोर्ड निकाल 2024 तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार सकाळी 11 वाजता CISCE च्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जातील. cisce.org या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील. 

CISCE 10th 12th Result 2024: आयसीएसई दहावी, बारावी परीक्षांचे निकाल कसे पाहाल? 

ICSE बोर्ड निकाल 2024 अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन प्रसिद्ध केला जाईल. बोर्डानं जारी केलेल्या लिंकवरून तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता. यासाठी तुम्हाला येथे नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील : 

  • ICSE बोर्डाच्या cisce.org वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवरील रिजल्ट्स टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ICSE निकाल वेबसाईट results.cisce.org या पेज दिसेल. 
  • इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे ICSE Result 2024 Link वर क्लिक करा. इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी, ISC Result 2024 Link वर क्लिक करा. वेगळ्या लिंक्स न मिळाल्यास कोर्स पर्यायातून ICSE किंवा ISC निवडा.
  • CISCE लॉगिन पेज उघडेल. तुमचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड इथे टाका.
  • आता प्रिंट बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

CISCE बोर्डानं अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. ही पत्रकार परिषद साकेत, पुष्प विहार, सेक्टर 6, नवी दिल्ली येथे असलेल्या ICSE बोर्ड कार्यालयात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी निकाल जाहीर केला जाणार आहे. याशिवाय निकाल तपासण्याची लिंकही सक्रिय केली जाईल.

यावर्षी ISCE इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावीची परीक्षा 28 मार्च रोजी संपली, तर 12वीची परीक्षा 3 एप्रिलपर्यंत सुरू होती. गेल्या वर्षी बोर्डानं 14 मे रोजी निकाल जाहीर केला होता. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरलाTeam India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget