एक्स्प्लोर

HSC SSC Result 2022 10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार : बोर्ड

HSC SSC Result 2022 : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाने दिली

HSC SSC Result 2022 : "दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल," अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं. त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी 3 ते 6.30 अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

विद्यार्थी आणि पालकांची चिंता मिटली
खरंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का असाही सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. परंत आता जून महिन्यात निकाल लागणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं होतं? 
परंतु दहावीची आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील, मार्चमध्ये एक मिटिंग झाली. पुढच्या आठवड्यातही एक मीटिंग होणार आहे. साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतातय यावर्षी ही निकाल वेळेत लागतील, असं राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्या अहमदनगरमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात बोलत होत्या.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Jain Boarding: रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
Election Commission : संपूर्ण देशभरात SIR राबवणार, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
संपूर्ण देशभरात SIR, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Deal: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहार रद्द', बिल्डर Vishal Gokhale यांचा मोठा निर्णय
Jain Bording Land Deal : बिल्डर Gokhale व्यवहार रद्द करणार, तरीही राजू शेट्टी आक्रमक
ECI PC Voter List Row: देशव्यापी मतदार यादीची फेरछाननी होणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : दोन दिवसात व्यवहार रद्द करा, मोहोळ यांना जिलेबी भरवू
Kartiki Mahapuja : 'उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पूजा करणार', शिक्षणमंत्री Dada Bhuse यांचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Jain Boarding: रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
Election Commission : संपूर्ण देशभरात SIR राबवणार, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
संपूर्ण देशभरात SIR, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Phaltan Crime : फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Embed widget