एक्स्प्लोर
Advertisement
HSC Result 2024: बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; मार्कशीट कशी डाऊनलोड कराल?
12th Result 2024 : राज्यात कोकण बोर्डाचा 97.51 टक्के निकाल लागलाय. तर मुंबईत सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागलाय.
HSC Result 2024 : पुणे : यंदा राज्याचा बारावीचा निकाल (12th Exam) 93.37 टक्के लागलाय.तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारलीय. राज्यातील (Maharashtra News) 95 टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. तर कोकण बोर्ड अव्वल आलंय. राज्यात कोकण बोर्डाचा 97.51 टक्के निकाल लागलाय. तर मुंबईत सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागलाय. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के निकाल अधिक लागला आहे. दरम्यान, दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे.
कसा पाहाल निकाल?
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
- निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.
- संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.
- या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
- गुणपत्रिका तुम्ही डाऊनलोड करुन तिची प्रिंटही काढू शकता.
कुठे पाहता येणार निकाल?
- mahresult.nic.in
- http://hscresult.mkcl.org
- www.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- http://results.targetpublications.org
निकालाबाबत आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागेल?
- निकाल हाती आल्यानंतरही अनेकांना आपल्या निकालाविषयी आक्षेप असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 22 मे ते 5 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.
- गुण पडताळणीसाठी बुधवार, 22 मे ते बुधवार, 5 जूनपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रती विषय 50 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement