FYJC Result Admission : अकरावीच्या प्रवेशाचा 'श्रीगणेशा'; ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक भरता येणार
FYJC Result Admission : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक भरता येणार आहे.
FYJC Result Admission : दहावीची परीक्षा (SSC Exams) दिल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अकरावीच्या प्रवेश (11th Admission Process) प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक भरता येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू होत आहे. आज या प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. एलेव्ह या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे. आणि त्यानंतर अर्जाचा पहिला भाग भरून शुल्कही भरायचं आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचं आहे. दहावीचा निकाल आल्यानंतर विद्यार्थ्यांना या अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. यात विद्यार्थ्यांना आपली महाविद्यालयाची पसंती देता येणार आहे.
मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशाची अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे. तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचे आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.
या वर्षापासून प्रवेश प्रक्रियेत बदल
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-2 भरून त्यानंतर दरवर्षी प्रमाणे तीन नियमित फेऱ्या होतील. त्यानंतर एक विशेष फेरी होईल. या चारही फेऱ्यांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षापासून 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' ही फेरी रद्द करण्यात आली आहे.
दहावी, बारावीचा निकाल कधी?
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार? शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडूंनी सांगितली 'ही' तारीख
- शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिषदेकडून वेब पोर्टल लॉन्च; घेणार तज्ज्ञांची मदत
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI