FYJC Admission : अकरावी CET रद्द, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढली; विद्यार्थी, पालक चिंतेत
FYJC Admission : हायकोर्टानं काल अकरावी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सुनावला. पुन्हा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं.
FYJC Admission : मुंबई उच्च न्यायालयानं अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली. पण त्यामुळे आता अकरावी प्रवेशप्रक्रियेवेळी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. अंतर्गत मुल्यमापनद्वारे जे गुण विद्यार्थ्यांना दहावीत मिळाले आहेत. त्या गुणांच्या आधारे आता अकरावीत प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे यावर्षी दहावीच्या ऐतिहासिक निकालामुळे आलेला गुणांचा फुगवटा आणि 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवतांची संख्या पाहता नामांकित कॉलेजमध्ये 95 टक्के गुणसुद्धा कमी पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अकरावी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल मुंबई उच्च न्यायालयानं सुनावला आणि पुन्हा नामांकित कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश घ्यायचं विद्यार्थ्यांचं टेन्शन काही प्रमाणात का होईना आणखी वाढलं. त्याचं मूळ कारण अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झालेला दहावीचा निकाल आणि त्यात मिळालेले भरघोस नव्वदीच्या पार गुण. त्यामुळे तुम्हला 90 टक्के पेक्षा जास्त गुण जरी मिळाले असतील तरी तुम्हाला नामांकित कॉलेज मिळेल याची शाश्वती नाही. याचं कारण नव्वदी पार गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या.
मुंबईतील गुणवंत विद्यार्थ्यांची आकडेवारी :
- 90 % आणि त्याहून अधिक : 15540- 4.40 % विद्यार्थी
- 85 % ते 90 % : 21992- 5.87% विद्यार्थी
- 80% ते 85 % : 32294- 8.62% विद्यार्थी
- 75 % ते 80 % : 41992- 11.21% विद्यार्थी
आता ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेण्याचा विचार करताय, त्या कॉलेजचा मागील वर्षीच्या कट ऑफ बाबत जाणून घ्या. म्हणजे त्यापेक्षा साधारपणे 2 ते 3 टक्के गुणांनी कट ऑफ वाढणार असल्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञानी व्यक्त केली आहे.
मुंबईतील नामांकित कॉलेजचा मागील वर्षीचा कट ऑफ :
रुईया महाविद्यालय
आर्टस् : 94.2 टक्के
सायन्स : 94.8 टक्के
वझे केळकर महाविद्यालय
आर्टस् : 91.6 टक्के
कॉमर्स : 93.6 टक्के
सायन्स : 94.4 टक्के
झेवीयर्स महाविद्यालय
आर्टस् : 94.6 टक्के
सायन्स : 91.4 टक्के
रुपारेल महाविद्यालय
आर्टस् : 91.2 टक्के
कॉमर्स : 92 टक्के
सायन्स : 93.4 टक्के
मिठीबाई महाविद्यालय
आर्टस् : 89.4 टक्के
कॉमर्स : 91.8 टक्के
सायन्स : 89.8टक्के
के सी महाविद्यालय
आर्टस् : 90.2 टक्के
कॉमर्स : 92.2 टक्के
सायन्स : 89.4 टक्के
जय हिंद महाविद्यालय
आर्टस् : 92.6 टक्के
कॉमर्स : 92.6 टक्के
सायन्स : 89.4 टक्के
आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर विद्यार्थी पालकांच्या लक्षात आलं असेल की, मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी किती स्पर्धा आहेत. जेमतेम नामांकित कॉलेजमध्ये अडीच ते तीन हजार जागा त्यात 15 हजार विद्यार्थी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण त्यामुळे यावर्षी नामांकित कॉलेजच्य प्रवेशासाठी 95 टक्के गुण सुद्धा कमी पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यावर्षी कितीही गुण मिळवलेले गुणवंत असाल तरी सुद्धा तुम्हाला नामांकित कॉलेज मिळेलच असे नाही. कारण यावर्षी निकालातला फुगवटा आणि रद्द झालेली सीईटी यामुळे नामांकित कॉलेज मिळवण्यासाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. नामांकित कॉलेज सर्वांना मिळेलच याची शाश्वती जरी नसली, तरी अकरावी प्रवेश सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे निराश न होता अकरावी प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवायचा आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI