एक्स्प्लोर

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, अकरावीच्या सामान्य गुणवत्ता यादीबाबत मोठी अपडेट, कोणत्या शाखेला सर्वाधिक पसंती?

FYJC Admission : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अकरावीची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे.

मुंबई : दहावीचे निकाल (SSC Exam Result) जाहीर होत असताना राज्यातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (FYJC Admission ) सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. मुंबई विभागातील (Mumbai Division ) अकरावी प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये नऊ विद्यार्थ्यी शंभर टक्के असणार आहेत. मुंबई विभागात अकरावीमध्ये प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या सर्वांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. 


मुंबई विभागातील जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीनुसार 2 लाख 47 हजार 664 जागांसाठी 2 लाख 38 हजार 953 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे. 


मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची पसंती वाणिज्य शाखेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ 93 हजार 895 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली आहे. कला शाखेसाठी केवळ 20429 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. पहिली सामान्य फेरी, त्यानंतर विशेष फेरीतून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. 

तात्पुतरत्या गुणवत्ता यादीतील माहितीनुसार 54 टक्के विद्यार्थी  हे 99 ते 99.99 टक्के गुण मिळवणारे आहेत. 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 60 ते 79.99 गुण आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2 लाख 34 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयसीएसईच्या 13837 तर सीबीएसईच्या 10858 च्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील माहिती आणि अचूकता तपासून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत दुरुस्तीसाठी विनंती करण्याच्या सूचन देण्यात आलेल्या आहेत.

मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रकियेद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मुंबईतील अकरावीच्या एकूण जागांपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दुसरीकडे मुंबईतील विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान आणि कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक आहे. आपल्या मुलांना वाणिज्य शाखेतून शिक्षण देण्यासाठी मुंबईतील बहुतांश पालक आग्रही असल्याचं चित्र आहे.  वाणिज्य शाखेपाठोपाठ विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला पसंती आहे. सर्वात कमी प्रतिसाद कला शाखेला मिळत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 

संबंधित बातम्या : 

पोलीस भरतीच्या 2 लाख उमेदवारांची व्यथा, मनोज जरागेंना मंत्र्यांचा फोन; शंभूराज देसाईंकडून आश्वासन

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Embed widget