Exam Calendar 2024 : विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! NEET UG सह 'या' प्रवेश परीक्षांसाठी जानेवारीमध्ये नोंदणी सुरू
Exam Calendar 2024 : अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि फार्मसीसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याच्या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी सुरू होणार आहे.
Exam Calendar 2024 : विद्यार्थ्यांसाठी (Student) जानेवारी (January) महिना महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनेक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. जेईई मेन सेशन-1 ची परीक्षा 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जेईई मेनसाठी नोंदणी आधीच झाली आहे. तर CUET PG 2024 साठी नोंदणी प्रक्रिया 26 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात ज्या परीक्षांसाठी नोंदणी सुरू होणार आहे त्यांची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.
महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET)
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा (MHT CET) द्वारे केले जातात. MHT CET 2024 परीक्षेसाठी नोंदणी जानेवारी महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. MHT CET 2024 परीक्षा 16 एप्रिल ते 5 मे 2024 या कालावधीत घेण्यात येईल. अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्याा.
NEET UG 2024
NEET UG ही पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. याद्वारे एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS) सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. NEET UG NTA द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते. NEET UG 2024 ची परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही NEET UG 2024 neet.nta.nic.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.
CUET UG 2024
केंद्रीय विद्यापीठ आणि अनेक राज्य विद्यापीठांमधील प्रवेश हे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (CUET 2024) च्या स्कोअरवर आधारित आहेत. CUET UG 2024 परीक्षा 15 मे ते 31 मे 2024 या कालावधीत घेण्यात येईल. त्यासाठीची नोंदणी प्रक्रियाही जानेवारी महिन्यातच सुरू होणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI