एक्स्प्लोर

Dada Bhuse on TET Exam Paper Leak: परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितली इनसाईड स्टोरी,म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना...'

Dada Bhuse on TET Exam Paper Leak: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी पेपर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dada Bhuse on TET Exam Paper Leak: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी (TET Exam) पेपर लीक (Paper Leak) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महत्त्वाची माहिती दिली असून, "या गैरप्रकाराची शासनाने गंभीर नोंद घेतली असून मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा दिला आहे.

Dada Bhuse on TET Exam Paper Leak: संशयितांकडील प्रश्नांमध्ये आढळले साम्य; शिक्षणमंत्र्यांची माहिती

पत्रकारांशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, पाठीमागच्या काळामध्ये नीट (NEET) परीक्षेमध्ये जे काही पेपरफुटीचे प्रकरण घडले होते, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने देखील यंदा पूर्ण काळजी घेतलेली होती. परंतु, आज पहाटे ठाणे भिवंडी पोलिसांच्या माध्यमातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडीमध्ये काही इसमांकडे टीईटीचा पेपर उपलब्ध असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली.

पोलिसांनी तातडीने या विषयावर कारवाई करत मोठी ॲक्शन घेतली आणि संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक पडताळणी दरम्यान, या संशयितांकडून मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांमध्ये साम्य आढळले आहे. हा घडलेला प्रकार अत्यंत गंभीर बाब असून, पोलीस प्रशासनाच्या चौकशीमध्ये ज्या काही बाबी समोर येतील त्याप्रमाणे दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

Dada Bhuse on TET Exam Paper Leak: मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

या पेपरफुटीच्या संशयानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून 28 जून रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने दखल घेत पोलीस प्रशासनाला या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचे आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही."

When will the TET exam be held again?: पुन्हा टीईटीची परीक्षा कधी होणार?

टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू, असं प्रिया शिंदे यांनी सांगितले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते, असं प्रिया शिंदे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील 6 लाख 128  शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. 6 लाख 126 परिक्षार्थी कडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली. तसेच 37 शहरातील 1028 परिक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जाणार आहे, असंही प्रिया शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा 

Satyajeet Tambe on TET Exam Paper Leak: भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही'; TET पेपरफुटीवर सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget