11th admission : पुढील वर्षापासून 11वीचा प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होणार, शिक्षण विभागाचा निर्णय जारी
राज्यभरातील इयत्ता अकरावीचे प्रवेश 2025-26 या शैक्षणिक वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

मुंबई : राज्यभरातील इयत्ता अकरावीचे प्रवेश 2025-26 या शैक्षणिक वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
इ.11 वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांच्या स्तरावर होणार आहे.
आतापर्यंत फक्त मुंबई एम एम आर रीजनसह सहा महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने व्हायची मात्र आता राज्यभर ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
स्कूल बसेससाठी नवी नियमावली
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली (New Rules & Regulations) निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी दिली.
संपूर्ण राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या हजारो स्कूल बस खाजगी संस्थांच्या मार्फत चालवण्यात येतात. या स्कूलबसच्या माध्यमातून अनेक संस्थांचालक पालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने 24 फेब्रुवारी रोजी परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून या स्कूल बसेस साठी नवी नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून या समितीने आपला अहवाल पुढील एक महिन्यांमध्ये सादर करावयाचा आहे.
या संदर्भात सन 2011 मध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यासाठी मदान समितीने ज्या उपायोजना सुचवल्या होत्या त्या देखील विचारात घेतल्या जाणार आहेत. या सर्वंकश अहवालाच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली निश्चित केली जाणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























